तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 December 2019

न्या. भालचंद्र देबडवार यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्ती


नांदेड
नांदेडचे भूमिपुत्र तथा न्यायमूर्ती भालचंद्र उग्रसेन देबडवार यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे . उद्या दिनांक 5 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात ते न्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.
नांदेड चे भूमिपुत्र असलेले न्या. भालचंद्र  देबडवार यांनी नांदेडच्या न्यायालयात तब्बल आठ वर्ष वकिली केली होती.  1992 मध्ये  त्यांची न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवड झाली होती . त्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांनी रत्नागिरी, सांगली, सोलापूर येथे काम केले .तर त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सहकारी न्यायालयाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कर्तव्य पार पाडले होते. नांदेडचे भूमीपुत्र असलेले न्यायाधीश भालचंद्र देबडवार यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली आहे .उच्च न्यायालयात एकूण सहा न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात भालचंद्र देबडवार यांचा समावेश आहे .उद्या दिनांक 5 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश यांच्या उपस्थितीमध्ये न्यायमूर्ती देबडवार आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील आणि शपथ घेतील अशी माहिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती भालचंद्र देबडवार यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल नांदेड अभिवक्त संघाचे अध्यक्ष मिलिंद देशपांडे, अँड. शिरीष नागापूरकर ,अँड. प्रवीण अग्रवाल ,अँड. बालाजी शिंदे आणि नांदेड जिल्हा अभियोक्ता संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आला आहे.

No comments:

Post a comment