तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

हेळंब येथे खंडोबा यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनसाठी गर्दी !
'येळकोट येळकोट जय मल्हार' जयघोषात भंडाऱ्याची उधळण 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
           येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात व  भाविकांच्या उपस्थितीत  खंडोबांच्या पालखीवर भंडारा, खोबर्यांची उधळण करीत हेळंब येथे भाविकांनी मनोभावे खंडेरायाचे दर्शन घेतले. मुख्य आकर्षण असलेला पालखी सोहळा पार पडला.त्यामुळे हेळंब गाव अक्षरश: भंडाऱ्यात  न्हाऊन निघाले. 

         तालुक्यातील हेळंब येथे चंपाषष्ठीनिमित्त  खंडोबा यात्रा महोत्सवाला आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. खंडोबा यात्रेनिमित्त 'श्री' चे दर्शनासाठी मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी झाली होती. दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. बीडसह  मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातुन भाविक भक्त दर्शनासाठी दाखल  झाले. गावातुन  खंडोबाची पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. पालखी सोहळा गावापासुन १ किलो मिटर अंतरावर असलेल्या  खंडोबा मंदिरात आणण्यात आली.यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषाने हेळंब परिसर दणाणुन गेला  होता.
पालखीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी दर्शन घेतले. शोभेची दारु उडवून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीवर भंडारा उधळण्यात आला. ग्रामस्थ पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते.

@@@@@

यात्रा भरली. .......
        हेळंब येथीलखंडोबा मंदिर व  हनुमान मंदिर समोर यात्रा भरली आहे . यात्रेत खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी होती. उंच व गोलाकार फिरणारे राहटपाळणे आदी खेळांच्या साधनाकडे बालगोपाळांनी  मोठी गर्दी केली होती. विविध खेळणी, मिठाई विक्रते व इतर साहित्य विक्रेत्यांचीही दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

No comments:

Post a comment