तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

श्री. दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र भाव कथा व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील हनुमान मंदिर, पद्मावती गल्ली येथे 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत श्री. दत्त जयंतीनिमित्त गुरूचरित्र भाव कथा व गाथा पारायण सोहळ्याचे  आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक पद्मावती गल्ली मित्र मंडळ परळी वैजनाथ यांनी केले आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पद्मावती गल्ली येथे दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. श्री. दत्त जयंतीनिमित्त गुरूचरित्र भाव कथा व गाथा पारायण सोहळ्याचे  आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास मार्ग. शु.9 गुरूवार, दि.05 डिसेंबर रोजी प्रारंभ होणार आहे. तर मार्ग.पोर्णिमा गुरूवार, 12 डिसेंबर रोजी सांगता होणार आहे. सोहळ्यात पहाटे 4 ते 6 काकडा,  सकाळी 7 ते 12 गाथा पारायण, दुपारी 2 ते 5 दत्तात्रय चरित्र कथा, 6 ते 8 हरिपाठ, सायंकाळी 8 ते 10 संगित भजन होणार आहे. गाथा प्रमुख ह.भ.प.श्री. माऊली महाराज रूमनेकर व गुरूचरित्र कथा प्रवक्ते ह.भ.प.श्री. दत्तात्रय महाराज बोर्डीकर राहणार आहेत. गुरूवार 5 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 10 माऊली भजनी मंडळ, शुक्रवार, 6 डिसेंबर राधाकृष्ण महिला भजनी मंडळ, शनिवार, 7 डिसेंबर राजधानी मंडळ, रविवार, 8 डिसेंबर श्री.संत सावतामाळी 
 भजनी मंडळ, सोमवार,9 डिसेंबर तुकाराम भजनी मंडळ, मंगळवार, 10 डिसेंबर सोमेश्वर नगर भजनी मंडळ, बुधवार, 11 डिसेंबर  सकाळी 10 ते 12 ह.भ.प. जगन्नाथ महाराज पंढरपूरकर यांचे दत्त जयंती निमित्त सुश्राव्य कीर्तन होणार आहे. रात्री 8 ते 10 श्रीकुमारजी पुराणिक प्रस्तुत दत्ताजी पालखी, उत्तरेश्वर गुरु माऊली संगीत विद्यालय , पद्मावती, गुरूवार 12 डिसेंबर सकाळी 8 ते 10 गुरूचरित्र ग्रंथ दिंडी मिरवणूक , 10 ते 12 ह.भ.प.भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसाद होणार आहे.  सिंतवादक ह.भ.प.श्री. जनक महाराज कदम, तबला वादक ह.भ.प.श्री. जगन्नाथ महाराज जिरेवाडी, हरिपाठ व काकडा आरती प्रमुख ह.भ.पश्री. नानवटे महाराज गुरुजी, विष्णुपंत महाराज वाघमारे, दयानंद महाराज, , बदाले  महाराज, सुरेश महाराज मोगरे, दराडे महाराज खामगावकर, विनेकरी प्रमुख ह.भ.प.सटवा महाराज दैठणकर, ह.भ.प.बनसोडे महाराज, यांची साथ राहणार आहे. तरी परळी तालुक्यातील व शहरातील, पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन पद्मावती मित्र मंडळ यांनी केले आहे.

No comments:

Post a comment