तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

सिद्धार्थ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजराऔरंगाबाद : येथील सिद्धार्थ महाविद्यालयात 26 नोव्हेंबर रोजी 70 वा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भीमगीत गायन,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व  विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  जिल्हा न्यायालयाचे वकील ऍड. प्रसेनजीत एडके उपस्थित होते,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य संयोजक डॉ. मिलिंद आठवले होते,यावेळी प्रा. शिलवंत गोपणारायन, प्रा. विनोद अंभोरे,व राम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी प्रमुख पाहुणे ऍड. प्रसेनजीत एडके यांनी बोलताना सांगितले की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व प्रकारच्या समाज घटकांचे हित डोळ्यासमोर ठेवून अत्यंत मेहनत घेऊन भारताच्या परिवर्तनाचा व  प्रगतीचा विचार करून लोकशाही मूल्य असलेली भारताची राज्यघटना निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा यासाठी हे मौलिक कार्य केले.यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. मिलिंद आठवले यांनी सांगितले की, भारतीय संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य व बंधुता या त्रिसूत्रीमुळे जगभरात भारताच्या लोकशाहीचा आदराने उल्लेख होतो, आपल्या देशात भारतीय संविधानाने हक्क व कर्तव्ये एकत्रित ठेवल्याने समाजात सहिष्णुता अधिक प्रगल्भ होऊन लोकशाही सक्षम होत असल्याचे दिसून येते, भारतीय संविधानातील लोकशाही अधिक गतिमान करण्यासाठी व लोकांमध्ये रुजविण्यासाठी आजच्या पिढीने संविधाना बद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही डॉ. आठवले यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद धुळे यांनी केले, सूत्रसंचालन अमरदिप हिवराळे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय दुर्गा राठोड , कोमल वाघमारे यांनी करून दिला,तर आभार भारती तायडे यांनी व्यक्त केले,
याप्रसंगी निलेश वाघमारे, गौतम खिल्लारे, श्रीकांत पातोडे, भगवान पगडे,प्रियदर्शन ताजने,अविनाश कांबळे,दीपक पाईकराव, कौतीक जंजाळे कल्याण नलावडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले, यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a comment