तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी


 माहिती आधार संलग्न करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

बीड (प्रतिनिधी) :-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी १ डिसेंबर 2019 नंतर पात्र लाभार्थ्यांस वितरीत करण्यात येणारे सर्व हप्ते आधार लिंक आधारीतच करण्यात येणार आहेत. त्याकरीता पी.एम. किसान पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांना नावे आधार प्रमाणे नोंदणी व दुरुस्ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
यासाठी  लाभार्थीं शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या  pmkisan.gov.in  या संकेतस्थळावर farmer corner या पर्यायामध्ये जावून Edit Aadhar Failure Reords ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सुविधेमार्फत योजनेच्या लाभार्थींना पोटलवर जाऊन स्वत: त्यामधे दुरुस्ती करता येईल. तसेच CSC LOGIN या सुविधेमध्ये राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत लाभार्थींना आधार दुरुस्ती व इतर सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील आपले सरकार सेवा केंद्राची  (CSC ) सुविधामार्फत मोठ्या प्रमाणावर पात्र  लाभार्थी त्यांची आधारकार्ड आधारीत माहिती पी.एम. किसान योजनेच्या पोर्टलवर सुधारीत करु शकतील.
               केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान)  योजनेअंतर्गत  दि. 1 ऑगस्ट 2019 पासून पात्र लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांस पी.एम. किसान योजनेचा लाभ देण्यात येणार होता. राज्यस्तरावर जवळपास 50 लाख पी.एम. किसान योजनेमधील पात्र लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक नसल्यामुळे बरेच लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात.

No comments:

Post a comment