तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 8 December 2019

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त महा आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा- रवि कांदेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी येथे दि.11 व इतर 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्ताने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गरजू रूग्णांनी दोन दिवसीय शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि कांदे यांनी केले आहे.
      या बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील उप जिल्हा रूग्णालयात ११ व १२ डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्ताने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकाराने महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ११ तारखेला सकाळी ९ ते सायंकाळी ५ वा. आणि १२ तारखेला सकाळी ९ ते १२ वा. दरम्यान हे शिबीर होणार आहे. शिबीरात सहभागी होणा-या गरजू रूग्णांची सर्व आजारांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. पुरूष, स्त्री व लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचार देखील यात होणार आहेत. नेत्ररोग, मोतीबिंदू, त्वचारोग, दंतरोग, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, अस्थिरोग, कर्करोग उपचार, रक्तदाब, मधुमेह, थायराॅईड, किडनी आदी वेगवेगळ्या आजारांची तपासणी यात होणार आहे. शिबीराचा जास्तीत जास्त गरजू रूग्णांना लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि कांदे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment