तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

सुरेशराव वैद्य (पारगांवकर) यांचे निधन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील सुरेशराव भगवानराव वैद्य (पारगांवकर)  यांचे दि.2 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 2 वाजता दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी ते 74 वर्षाचे होते.       त्यांच्या पार्थिवदेहावर रात्री 8.30 वाजता  शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.    
             वैद्यनाथ मंदिर रोडवरील न.प.समोर राहत असलेल्या  सुरेशराव भगवानराव वैद्य (पारगांवकर) हे धार्मिक वृत्तीचे व मनमिळावू व्यक्तीमत्व असल्याने ते सर्व परिचित होते. डॉ. विनय व  डॉ. किरण पारगावकर यांचे ते चुलते होते तर  न. प. समोरील श्रीकृष्ण एंटरप्राइजेस चे संचालक सुनील वैद्य (पारगांवकर) यांचे ते वडील होते.  त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुली, एक मुलगा, तीन बहिणी, एक भाऊ,  सूना,  नातवंडे असा परिवार आहे. वैद्य कुटूंबियावर कोसळलेल्या दुःखात तेजन्युज हेडलाईन्स परिवार सहभागी आहे.
बुधवारी राखसावडण्याचा विधी
        दि. 4 डिसेंबर 2019 बुधवार रोजी सकाळी आठ वाजता राखसावडण्याचा विधी सार्वजनिक स्मशानभूमी परळी येथे होणार आहे.  

No comments:

Post a comment