तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 9 December 2019

ताडकळस येथील हाटकर गल्ली एक महिन्यापासून अंधारात विद्युत मंडळाचे जाणीवपूर्वक

 ताडकळस / प्रतिनिधी शेख शेहजाद              ताडकळस येथील मुख्यगावातील हाटकर गल्लीतील विद्युत रोहित्र जळाल्याने हा परिसर एक महिन्यापासून अंधारात आहे.या बाबीकडे ताडकळस येथील विद्युतमंडळाचे कर्मचारीनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष ताडकळस येथील फक्त हाटकर समाजातील गल्लीत का अंधार आसा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.याबाबीकडे येथील स्थानीक लोकप्रतिनिधी या समस्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ताडकळस येथील मुख्यगावातील रोहित्र हाटकर गल्ली परिसरात या रोहित्रावर गावातील दोन मोठ्या गल्ली व शेतातील काही भागात कनेक्शन आसल्याने या रोहित्रावर अतिरिक्त भार होत असल्याने हा रोहित्र नेहमीच जळत असल्याने या परिसरात नेहमीचाच अंधार पाहायला मिळत आहे.या परिसरातील रोहित्र जळाल्याने सध्या फक्त हाटकर गल्लीतच अंधार आहे.या रोहित्रावरिल बाकी परिसर मात्र येथील स्थानीक विद्युतकर्मचारी दुसर्या विद्युतरोहित्रावरून त्या भागातील विद्युतपुरवठा सुरू केला आहे.यामुळे दुसरा देखील रोहित्र जळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ताडकळस येथील विद्युतसमस्या ऊदभवल्यास येथे जबाबदार आसा कोणताही आधिकारी नसल्याने येथील विद्युतसमस्या नेहमीच वाढत आहे.येथील रोहित्र जळाल्याने अर्धं गाव एक महिन्यापासून अंधारात आहे याबाबीकडे विद्युतमंडळाचा कर्मचारी अथवा येथील स्थानीक लोकप्रतिनिधीना या समस्याकडे सोडवयाला वेळ मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी बोलवून दाखविले आहे. हाटकर गल्लीत विद्युतसमस्या नेहमीच घडत असल्याने या परिसरातील ग्रामस्थांना अनेक आडचणीना सामोरे जावे लागत आहे,विद्युतपुरवठा खंडित झाल्याने पिठाची गिरणी,पाण्याची मोटारी बंद झाल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबीकडे विद्युत मंडळाच्या वरिष्ठानी या रोहित्राची पाहणी करून हाटकर गल्लीतील ग्रामस्थांची आडचण दुर विद्युतपुरवठा सुरळीत करावा व या रोहित्रावरील अतिरिक्त भार काढुन या परिसरातील विद्युतपुरवठा सुरळीत करावा आशी मागणी ताडकळस ग्रामस्थांनी केले आहे.

No comments:

Post a comment