तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 9 December 2019

पांगरखेड येथे संतशिरोमणी संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर व भव्य मिरवणुक.  पांगरखेड :
 पांगरखेड येथे दिनांक ०८/१२/२०१९ रोजी संतशिरोमणी संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि. प. सदस्य  राजुभाऊ पळसकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.गजानन उल्हमाले  उपस्थित होते. शिवाय सरपंच श्री गणेश नालींदे, उपसरपंच घनशाम सुर्वे,ग्राम सचिव शरद वानखेडे व गावकरी मंडळी उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिरात काही लोकांनी सपत्नीक रक्तदान केले. त्यात श्री गोपाल विश्वनाथ पाखरे , सौ.शारदा गोपाल पाखरे , बळीराम वसंतराव राऊत ,. सौ.जया बळीराम राऊत , संतोष गजानन दिवाणे, सौ.ममता संतोष दिवाणे, विजय भास्कर मांजरे, सौ.सीमा विजय मांजरे, सुधाकर मधुकर काटेकर , सौ.संगीता सुधाकर काटेकर , सौ.कमल शंकर शिरभैये, सौ.उषा लक्ष्मण मांजरे, जीवनलता नंदकिशोर काटेकोर, सौ.संध्या दलीत शिंगणे हे दांपत्य तसेच गावातील इतर मंडळी असे एकूण १०१ लोकांनी रक्तदान केले  .हे कार्यक्रम संताजी नवयुवक मंडळ व ग्राम संसद पांगरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.तसेच दिनांक ०९/१२/२०१९ रोज सोमवार ला सकाळी अकरा वाजता संतशिरोमणी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पालखीची गावातून भव्यदिव्य मिरवणूक भजन कीर्तन यांच्या गजरात काढण्यात आली. त्यानंतर संत गजानन महाराज मंदिरासमोर संताजी महाराजांची आरती झाली.व नंतर महाप्रसदाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते अनंतराव दिवाणे, बळीराम राऊत , बंडू पोदाडे, गोपाल पाखरे,  शाम क्षिरसागर, नारायण सुर्वे, उपस्थित होते.


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment