तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या 'स्त्री जन्माच्या' आवाहनाला प्रतिसाद ; भगवान भक्तीगडावर झाले लेकीच्या जन्माचे स्वागत ; खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते मिसाळ दांम्पत्यानी बांधला कन्येला धागा

 भगवान भक्तीगडावर झाले लेकीच्या जन्माचे स्वागत ; खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते मिसाळ दांम्पत्यानी बांधला कन्येला धागा

बीड (प्रतिनिधी) :- दि.०२------- समाजात स्त्री जन्माविषयी वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करणा-या भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी सावरगांवच्या भगवान भक्तीगडावरून केलेल्या आवाहनाला जन माणसातूनही  चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा प्रत्यय नुकताच आला. पाटोद्याच्या मिसाळ दाम्पत्यांने पोटी जन्मलेल्या  लेकीला खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते भगवान भक्तीगडावर 'धागा' बांधून स्त्री जन्माचे स्वागत तर केलेच पण इतरांसमोर आदर्शही निर्माण केला.  

   सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतेवेळी स्त्री जन्माचे स्वागत करताना जन्मलेल्या कन्येला भगवान भक्तीगडावर आणून धागा बांधण्याचे आवाहन केले होते. समाजाने स्त्री जन्म नाकारू नये, तिला जन्माला घालावे अशी यामागे धारणा होती. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या अभिनव आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अनेक दाम्पत्य आपल्या जन्मलेल्या  लेकीला याठिकाणी धागा बांधून तिचे स्वागत करत आहेत. 

 रविवारी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सावरगांवला भेट दिली, त्यावेळी  मिसाळवाडी (अंमळनेर) ता.पाटोदा येथील वर्षा व अभिमन्यू मिसाळ दांम्पत्य आपल्या नुकत्याच जन्मलेल्या गौरीला घेऊन याठिकाणी आले होते, पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी संत भगवान बाबांच्या स्मारकाचे दर्शन घेतले आणि इथे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते गौरीला धागा बांधून स्त्री जन्माचे स्वागत केले.  संत भगवान बाबांच्या जन्मस्थळी खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते धागा बांधण्याचा योग आल्याने मिसाळ दाम्पत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

No comments:

Post a comment