तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 14 December 2019

नागरिकता संशोधन बिलाच्या विरोधात जमियत उलेमए हिंद चे धरणे आंदोलन.
 तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले.

 मेहकर :-

शासनाने नागरिकता संशोधन बिल राज्य सभेत पास केलं यात भारतीय नागरिकते साठी धर्माचा आधार देण्यात आलेला आहे जो संविधानाच्या   अनुच्छेद १४ व १५ अपमान आहे यावर जमियत उलमाए हिंद यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन मेहकर तहसील समोर आयोजित केले होते व तहसीदार मेहकर यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती याना एक निवेदन पाठवून जाचक असे नागरिकता संशोधन बिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
    केंद्र शासनाने नागरिकता संशोधन बिल २०१९ आणले मात्र यात संविधानाने दिलेल्या धर्म निरपेक्षतेला तळा जाईल तेव्हा नागरिकता संशोधन बिलात सांगण्यात आले की शेजारील राष्ट्रात असलेल्या अल्पसख्यक उतपीडित शरणार्थी नागरिकांना नागरिकता देण्या साठी आणला मात्र यात देण्यात येणारी नागरिकता धर्माच्या आधारे आहे जे भेदभाव दर्शवितो,संविधानाच्या अनुच्छेद १४ व १५ नुसार प्रत्येकाला समान दर्जा देण्यात आलेला आहे कोणालाच धर्माच्या आधारे भेदभाव करता येणार नाही असे असताना नवीन नागरिकता संशोधन बिल या विरुद्ध आहे तर १९८५ च्या आसाम समझोता करार सुद्धा संपुष्टात येईल,विविधतेने नटलेल्या भारत देशात धर्माच्या आधारे करण्यात येणारे नागरिकता संशोधन हे मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे तेव्हा असे जाचक बिल रद्द करण्या साठी जमियत उलेमाए हिंद यांनी मेहकर तहसील समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदार मेहकर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनावर मौलाना महोम्मद जावेद,मौलाना मुसव्वीर,मैलाना हुसेन,नगर अध्यक्ष कासम गवळी,हाजी आलीम गट नेता, मुजीब हसन कुरेशी,शे चांद कुरेशी,निसार अहेमद,शेरू कुरेशी,मो नाजीम,सय्यद हरून, सादिक कुरेशी,शेक अकतर आदींच्या साह्य आहेत
जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment