तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

अ‍ॅड. बागल यांना ठाकरे सत्तेत मिळणार संधीबाळू राऊत प्रतिनिधी 
 मुंबई : सातारा जिल्ह्यातील चितळी गावचे सुपुत्र व महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या

राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी बागल यांना महाविकास आघाडीच्या सत्तेत काम करण्याची संधी मिळणार असल्याचे संकेत मिळाल्याने पदाधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.  
मुख्यमंत्री शपथविधीसाठी उध्दव ठाकरे यांनी घटकपक्षाचे प्रमुख अ‍ॅड. बागल यांना शिवतीर्थ मैदानावर बोलवून त्यांचा यथोचित सन्मान केला असून  यावेळी महाविकास आघाडीच्या सत्तेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे स्वराज्य सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a comment