तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

श्री जिवाजी महाराज यात्रोत्सवास उत्साहात सुरुवातदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढविली रंगत


सेलू / प्रतिनिधी : भंडाऱ्याची मुक्त उधळण...मुखी यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष...
जिल्हासह परजिल्ह्यातील भाविकांची दर्शनासाठी उसळलेली गर्दी... अशा चैतन्यपूर्ण वातावरणात जवळा येथील श्री जिवाजी महाराजांच्या  वार्षिक यात्रोत्सवास सोमवारपासून  ( २ डिसेंबर )उत्साहात सुरुवात झाली. 
यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेची ओढ नागरिकांना खरी दिवाळीपासूनच लागते, दरम्यान परिसरात यात्रेचा हंगाम सुरू झाला असून, जवळा येथील यात्रेनंतरच परिसरातील कोठा देवगावफाटा, सेलू, चारठाणा येथील यात्रांना सुरवात होते.  
सेलू राज्य मार्गावरील चिकलठाणा पाटीपासुन अवघे दोन किलोमीटर अंतरावर आहे. चंपाषष्टी या मुहूर्तावर सुरवात होणाऱ्या जवळा येथील यात्रेनिमित्त संपूर्ण मंदिराची रंगरंगोटी, डिजिटल विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  हे मंदिर उत्तराभिमुख असून, मंदिराच्या घुमटावर कोरीव असे नक्षीकाम कोरलेले आहे. मंदिरात शिवशंकराचे शिवलिंग असून मंदिरासमोरील सभामंडपात शिववाहन नंदिची भव्य मूर्ती विराजमान आहे, तर सभागृहाबाहेरही कोरीव असे नक्षीकाम केलेले भव्य दिव्य प्रवेशद्वार ऊभे आहे. जागृत देवस्थान म्हणून ख्याती असणाऱ्या या यात्रेला जिल्ह्यासह मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भक्तगण हजेरी लावतात. यात्रेदिवशी अबालवृद्धांकडून 'श्री' नैवेद्य अर्पण करण्याबरोबरच नैवेद्य आणि मिठ-पिठाचा कोठंबा भरण्यात येतो व नैवेद्य म्हणून वांग्याच्या भरीताचा या दिवशी विशेष मान असल्याने प्रत्येकजण हा नैवेद्य अर्पण करून 'श्री' ला 'सुख शांती लाभो दे' असे साकडे घालतो तसेच वाघ्या असलेली मंडळी शौर्याचे प्रतिक संबोधल्या जाणाऱ्या वसारीचे फटके अंगावर ओढून घेत खंडोबाच्या चरणी आपली सेवा रूजू करतो यात प्रत्येक भक्तगणाच्या चेहर्‍यावर समाधानाची एक लकेर दिसून येते. सकाळी सात वाजल्यापासून दर्शनासाठी असलेला भाविकांऐ दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी करू होती.   यात्रेनिमित्त रहाट पाळणे, मौत का कुआ, भेळवाले, स्टेशनरी वाले, मिठाई दुकान, हाॅटेवल्स, खेळणी आदी प्रकारामुळे बचे कंपनीचीही एकच गर्दी झाली आहे. यात्रेनिमित्त येथील ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले आहे.

चौकटीचा मजकूर.

सायंकाळी 'श्री' ची पालखी मिरवणूक.

चंपाषष्टी यात्रेनिमित्त देवस्थान जवळा येथे मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून येणार्‍या भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना पालखी मिरवणुकीत सहभागी होता यावे, याकरिता जिवाजी महाराज देवस्थान समितीतर्फे सायंकाळी सजवलेल्या पालखीतून 'श्री' ची शेकडो हालग्यांच्या निनादात वाजत गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत यळकोट यळकोट जय मल्हार च्या गजरात भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत प्रदक्षिणामार्गे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत  गावचे सर्व प्रमुख, पंच, कर्मचारी, सुरक्षारक्षक, पोलीस स्थानिक ग्रामस्थ व विविध ठिकाणचे भावीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फोटो :

सेलू : जवळा जिवाजी मंदिरातील 'श्रींच्या '  मूर्ती.

पूर्ण... बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a comment