तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

रमाई घरकुल च्या लाभार्थाना रेती नसल्याने पालम येथे आमरण उपोषण चालू

आरूणा शर्मा


पालम :- शहरात रमाई आवास योजना अंतर्गत घरकुल मजुर झाले आहेत मात्र रमाई आवास योजने अंतर्गत नगरपंचायत पालम पात्र लाभार्थ्याना रेती (वाळू) मिळण्या साठी लाभार्थानी अनेकवेळा निवेदने दिली मात्र नगरपंचायत कार्यालय यांच्याकडून बांधकाम करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील सर्व रमाई घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यास रेती (वाळू) देण्यास टाळाटाळ करत आसल्याने दि. 2 डिसेंबर रोजी दुपारी पालम तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण चालू केले आहे. या लाभार्थाना रेती पुरवठा केला जात नाही तो पर्यंत उपोषण चालू राहील असे साहेबराव रावंसाहेब हनवते या लाभार्थानी निवेदना द्वारे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a comment