तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

(जागतिक दिव्यांगदिन विशेष) दिव्यांगावर मात करीत त्यांनी घेतला समाज प्रबोधनाचा वसा..! माध्यमातून करतात समाज प्रबोधन)

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

  दिव्यांगत्व हा शाप नसुन हा शारीक व्याधी आहे.जन्मताच पोलिओ चा व्याधी जडल्याने भिकाजी कोकाटे यांचे दोन्ही पाय निकामी झाल्याने कुटुंबातील आई-वडीलासह अनेकांचे मण हेलावूनगेले.परंतु आई-वडीलांनी जिवापाड पोलिओने व्याधीग्रस्त असलेल्या बाळाचे संगोपण केले.पुढे आई-वडीलांच्या कष्टाचे चिज करीत.बारावी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करीत हरीकिर्तणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वसा घेत समाजातील अनिष्ठ चाली-रितीवर परखडमत मांडीत समाज प्रबोधन केले.
   रिसोड तालुक्यातील मोरगव्हाण येथिल ह.भ.प.भिकाजी महाराज कोकाटे वय 38 वर्षे वयाच्या अठराव्या वर्षांपासून हरीपाठ,ज्ञानेश्वरी,रामायण,महाभारत,पांडव प्रताप,हरीविजय सारख्या अनेक ग्रंथासह संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम.संत सोपान.संत एकनाथ.संत मुक्ताबाई सारख्या संताचे अनेक ग्रंथ मुखपाठ करीत पुढे हरी किर्तनाचा वसा घेतला.मागील पंधरा वर्षाच्या कालावधीत अनेक गावामध्ये हजारो हरीकिर्तनाच्या माध्यमातून ह.भ.प.कोकाटे महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन.स्वच्छता अभियान.सामाजिक.सांस्कृतिक.शिक्षणासारख्या विविध बाबीवर हरिकीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले कोकाटे महाराजांच्या मधुर वाणीसह प्रखड विचारांवर हजारो श्रोते मोहित झालेले आहे.कुठल्याही समाजामध्ये जयंती.उत्सव.गणेश उत्सव.दुर्गात्सव.आशा विविध व्यास व्यासपीठाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वसा घेत समाज जणजागृती करण्याची एक जबाबदारीच ते निभावत आहे.
*चौकट = महिण्यातील प्रत्येक एका दशिला गावातील पारावर होते हरिकीर्तन* = ह.भ.प.हि भागवत धर्मातील वैष्णव पंथाची पदवी बहाल झाल्या नंतर प्रत्येक एकादशीला गावातील पारावर हरिकीर्तन झालेच पाहीजे.या प्रखड मताचे धनी ह.भ.प.भिकाजी महाराज कोकाटे आहेत.कारण अनेक गावातील महाराज आहेत.परंतु गावातील पारावर हरिकीर्तन म्हणजे पौर्णिमेचा चंद्रच म्हणावे लागेल.परंतु मोरगव्हाण येथे नित्यनेमाने हरिकीर्तन होणारच मग ग्रामस्थ आले किंवा नाही याची तमा न बाळगता एकदशीचे हे व्रत कोकाटे महाराज नित्यनेमाणे जपतात.


आज दि 3/12/2019  रोजी मौजे हिवरखेडा येथे गेल्या सहा दिवसा पासून भिकाजी कोकाटे महाराज मोरगव्हाकर हे भागवत कथेचे वाचन करीत आज जागतिक दिव्यांगदीना निमित्ताने हिवरखेडा येथे संतोष निरगुडे रंगनाथ निरगुडे शिवशंकर निरगुडे परिवारााकडुण भिकाजी महाराज  कोकाटे यांचा शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला तेज news हेड लाईन ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment