तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 December 2019

मा.केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस निमित्ताने हार्दिक शुभेच्छा

युध्दच नव्हे तर तहदेखील जिंकणारा महानेता !राजकीय जीवनामध्ये काही लढायांमध्ये माघार घ्यावी लागली तरी प्रत्येक तहामध्ये कायम सरशी मिळवणारे देशातील एकमेव राजकारणी म्हणून आपल्यासमोर शरदचंद्र पवार यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव समोर येत नाही.

राजकारणाला अनेकदा युध्दाची उपमा दिली जाते. आणि युध्दात जय-पराजयाइतकाच महत्वाचा असणारा घटक म्हणजे तह होय. मराठी वीर युध्दात जिंकतात मात्र तहात हरतात असे अनेकदा म्हटले जाते. यात तथ्यदेखील आहे. इतिहासातील अनेक घटना याचीच ग्वाही देणार्‍या आहेत. याचा विचार करता गेल्या साडेचार दशकांपेक्षा जास्त कालखंडाच्या राजकीय जीवनामध्ये काही लढायांमध्ये माघार घ्यावी लागली तरी प्रत्येक तहामध्ये कायम सरशी मिळवणारे देशातील एकमेव राजकारणी म्हणून आपल्यासमोर शरदचंद्र पवार यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव समोर येत नाही. मुरब्बी, मुत्सद्दी, चाणाक्ष, चतुर आणि अर्थातच काळाचा अचूक वेध घेणार्‍या या महानेत्याचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्वाच्या टप्प्यांवर नजर टाकली असता कोणत्याही स्थितीत कायम दोन पाऊल पुढे टाकण्याची त्यांची विलक्षण हातोटी आपल्याला थक्क केल्यावाचून राहत नाही.


मुळातच देशातील अन्य राज्यांमध्ये साठच्या दशकातच कॉंग्रेसेतर राजकीय विचार प्रबळ होत असतांनाही महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष अत्यंत भक्कम स्थितीत होता. या पुरोगामी भुमित कॉंग्रेसचा सर्वसमावेशक विचार चांगलाच रूजला होता. यातच यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाचे कॉंग्रेस सोडण्याचे ‘टायमिंग’ साफ चुकले होते. या पार्श्‍वभुमिवर, चाळीशीतही प्रवेश न केलेल्या शरदचंद्र गोविंदराव पवार या तरूणाने पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून स्वतंत्र चूल मांडण्याचे धाडस दाखविले. महाराष्ट्रात १९९५ साली युतीने प्रथम गैरकॉंग्रेसी सरकार स्थापन करण्याचे मानले जात असले तरी पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘पुलोद’ सरकारने आधीच कॉंग्रेसला पहिला धक्का दिला होता हे विसरून चालणार नाही. असे अनेक धक्के त्यांनी आजवर दिलेत हा इतिहासही आपल्यासमोर आहेच! अर्थात हा प्रयत्न अल्पजीवी ठरला. इंदिराजींच्या राष्ट्रीय राजकारणातील धमाकेदार पुनरागमनामुळे सगळे चित्र बदलले. महाराष्ट्रात शरदरावांच्या वाटचालीबद्दल शंका व्यक्त करण्यात आल्या. मात्र राज्याच्या कान्याकोपर्‍यात आपला पाया मजबुत करत असतांनाच त्यांनी राजीवजींच्या कालखंडात कॉंग्रेसमध्ये पुनरागमनाचा घेतलेला निर्णय हा अनेकदांना धक्कादायक वाटला. यावेळी त्यांनी दाखविलेली लवचिकता ही फक्त अपरिहार्य राजकीय तडजोडच नव्हती हे नंतर सिध्द झाले. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे पंधरा वर्षे तर दुसर्‍या टप्प्यात अंदाजे एक तप कॉंग्रेसमध्ये व्यतीत करतांना शरदराव पवार कॉंग्रेसी संस्कृती कोळून प्यायलेच नाही तर या पक्षातील वरिष्ठांच्या चालींना पुरूनही उरले.

देशातील कोणत्याही राज्यातून ‘हायकमांड’ला आव्हान देणारे नेतृत्व उदयास येऊ नये याची पुरेपुर काळजी कॉंग्रेसने आजवर घेतली आहे. यासाठी त्या-त्या राज्यातील प्रबळ समुदायातील नेत्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवितांना त्याच्या खुर्चीखाली फटाके पेरण्याचा ‘पॅटर्न’ आजवर राबविण्यात येत आहे. अर्थात एकाला मुख्यमंत्रीपद द्यायचे आणि दुसर्‍या तितक्याच तोलामोलाच्या नेत्याला त्यांच्याविरूध्द झुंजण्यासाठी बळ द्यायचे अशी पॉलिसी आजवर राबविण्यात येत आहे. यामुळे शरदरावांना आजवरच्या कॉंग्रेसमधील वाटचालीत विरोधकांपेक्षा सोबत बसलेल्यांच्या कुरघोड्यांनाही तोंड द्यावे लागले. ते याला पुरूनच उरले नाहीत तर या प्रकाराला त्यांनी ‘जशास तसे’ उत्तर दिले. यामुळे स्वकियांनी अनेकदा त्यांचा ‘अभिमन्यू’ करण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे हाणून पाडला. नव्वदच्या दशकात दिल्लीतील काही राजकीय घटनांमध्ये त्यांना माघार घ्यावी लागली. १९९१ मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मागे पडणे असो, नरसिंहा राव यांनी त्यांना महाराष्ट्रात परत पाठविणे असो की, कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव! एखाद्या नेता यामुळे गलीतगात्र होण्याची शक्यता होती. मात्र ते नाऊमेद झाले नाहीत. मुळातच कॉंग्रेसमधील ‘निष्ठे’च्या व्याख्येत आपण बसू शकत नसल्याची जाणीव होत असतांनाच सोनिया गांधी राजकारणात सक्रीय झाल्याचे पाहून शरदरावांनी स्वतंत्र वाट चोखाळणे हे त्यांच्या धाडसी स्वभावाला साजेसेच होते. मात्र हे करत असतांना सोनिया गांधींच्या विदेशी मुळाला आक्षेप घेण्याचा त्यांचा पवित्रा त्यावेळी अनाकलनीय वाटला. आयुष्यभर पुरोगामीत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या पवारांना एका महिलेच्या विदेशी मुळावर जावेसे वाटले याचे आश्‍चर्

No comments:

Post a comment