तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 9 December 2019

भाजपच्या ताब्यातील कुसळवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडे ; आ. धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली कुसळवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुक जिंकली


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी
काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आपला पहिला विजय बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात नोंदवला तर दुसराही परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी ही भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. परळीचे आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायत व परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुक जिंकली आहे

आज मतमोजणी नंतर गावातून भव्य मिरवणूक काढून विजयी सरपंच सदस्यांनी जल्लोष साजरा केला. धनंजय मुंडे यांनी नूतन सरपंच आश्रुबाई किरवले व प्रकाश चाटे यांचे अभिनंदन केले आहे.  यावेळी अंबाजोगाई पंचायत समितीचे सभापती शिवहर भताने गुरुजी, युवक नेते बालासाहेब कातकडे, लिबराज लहाने यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. या विजयासाठी तिन्हीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a comment