तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकी संदर्भात आज बीड येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
बीड (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकी संदर्भात आज बीड येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत घेतली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे प्रस्थ वाढवण्यासाठी अपार कष्ट घेतले व बीड जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण केली.

आपल्या नेत्या मा.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात न भूतो स्वरूपाची विकास कामे झाली आहे. कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन पक्ष संघटन मजबूत करावे.पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सक्रिय सदस्य असणे गरजेचे असल्यामुळे सक्रिय सदस्यांची अधिकाधिक नोंदणी करावी तसेच बूथ मजबूत करावेत,नेतृत्व व पक्षाची गरज ओळखून जवाबदारीने पक्ष वाढीसाठी व संघटन मजबुतीसाठी नव्या ऊर्जेने काम करावे असे आवाहन खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार,मा.आ.भीमराव धोंडे,मा.आ.आदिनाथ नवले,मा.आ.केशवराव आंधळे,मोहन जगताप,राजेंद्र मस्के,संतोष हंगे,सर्जेराव तांदळे,स्वप्नील गलधर,सुभाष धस,सलीम जहांगीर,अजय सवाई यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a comment