तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

वरफळ येथील युवकांनी हरणाला दिले जीवदान
*कामगिरीचे सर्वञ होत आहे कौतुक*

परतूर

शेख अॅथर/आशिष धुमाळ

तालुक्यातील वरफळ येथे राञी ०९ वाजेच्या सुमारास एक हिरण जखमी अवस्थेत पाहून गावातील तरुणांनी सदरील हरणाला उचलुन वनविभागाच्या अधिकाऱ्याला स्वाधीन केले यामुळे हरणाला नवजीवन प्राप्त झाले त्यामुळे सदरील युवकाचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

या विषयी सविस्तर माहिती अशी की गावातील युवक हे  उभे असतांना एक जखमी हरणाच्या मागे कुत्रे लागले त्यांनी तत्काळ हरणाचा कुत्र्यापासून सुटका केली आणि पत्रकार शेख अथर यांच्याशी संपर्क करून सविस्तर माहिती दिली 
 पत्रकार शेख वनविभागाच्या वरीष्ठ अधिकारी यांना माहिती कळविली काही वेळात वनविभागाचे कर्मचारी  आत्माराम राठोड तेथे आले व पुढील उपचारासाठी वैधकीय अधिकारी यांच्याकडे घेऊन गेले या सर्व कामी गावातील युवक जाबेर पटेल,सय्यद इसरार,अय्याज पटेल,मतीन पटेल,सय्यद हाजी,शिवाजी पठाडे,विठ्ठल पठाडे,मोहसीन पटेल,वहाब पटेल,मुज्जमिल पटेल,यांनी हरणाला नवसंजीवनी दिली तसेच यामध्ये माजी सरपंच हाजी खालेक सेठ ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी वनविभागाचे अधिकारी यांना घटनास्थळी मदत कार्यास हातभार लावला यासर्व प्रकारामुळे  हरणाच्या पिलाचा एक पायाला गंभीर जखम झाल्यामुळे त्याला वेळेवर उपचार भेटले त्यामुळे त्याचे प्राण वाचले असल्याचा समाधान युवकासह गावकऱ्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a comment