तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

अभिनव विद्यालयाचा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये नेत्रदीपक सहभागपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञानप्रबोधिनी शिक्षण विकास प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयातील प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ जब्दे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली 45 व्या तालुकास्तरीय  विज्ञान प्रदर्शन दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल तळेगाव या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला यामध्ये प्राथमिक विभागाने पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि शेतीसाठी उपयोग हा प्रयोग प्रदर्शित केला तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक खेळ विज्ञान व गणित यातील प्रतिकृती हा इलेक्ट्रिक साधनांवर आधारित प्रयोग सादर केला यावेळी  बीड जिल्हा जिल्हा परिषद शिक्षण सभापती  मा. राजेसाहेब देशमुख यांनी विज्ञान परिषद प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली यामध्ये  अभिनव विद्यालयाचे प्रयोग पाहून सादर कर्त्या विद्यार्थ्यांचे व  अभिनव विद्यालयाचे कौतुक केले या दोन्ही प्रयोगांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली सर्व शिक्षकांनी या सादर करत या प्रयोगाचे विद्यार्थी त्यांचे व विज्ञान शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment