तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती मोहीम

तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी 
सोनपेठ : येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने एड्स जनजागृती करण्यासाठी एड्स विषयक निबंधस्पर्धा आयोजित करून एडस निर्मूलन चिन्हाचे मानवी आकृती तयार करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्राचार्य शेख शकिला, आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
शहरातील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन यासाठी तिन क्रमांकावर बक्षीस देण्यात आले आहे, निबंधाचे विषय हे एड्स जनजागृती, एड्स समज गैरसमज एड्स कारणे व उपाय असे ठेवण्यात आले आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य शेख शकिला, आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी,प्रा. अंगद फाजगे, प्रा. गोविंद वाकणकर, प्रा. विशाल राठोड, प्रा. महालिंग मेहत्रे, प्रा. कैलास आरबाड, प्रा. आरती बोबडे, प्रा. मंगल गव्हाणे आदी होते. 
याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायत्री तोंडगे, तर प्रास्ताविक प्रा. पांडुरंग फले यांनी केले सर्वांचे आभार प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

No comments:

Post a comment