तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

संस्कार प्राथमिक शाळेत 'पालकांची शाळा'हा आगळा वेगळा उपक्रम संपन्न

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     आज दि.3/12/2019 वार मंगळवार रोजी एक आगळा वेगळा उपक्रम संस्कार प्रा. शाळेत राबवण्यात आला. त्याच बरोबर आज डॉ.राजेंद्र प्रसाद यांची जयंतीहीं साजरी करण्यात आली या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार प्रा.शाळेचे सचिव श्री दिपक तांदळे सर तर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक आनकडे सर तर आज एक दिवसासाठी शिक्षक होण्याचा अनुभव घेण्यासाठी आलेले पालक संतोष पंचाक्षरी, असद सय्यद, सविताताई सारडा, अनिता घेवारे ताई, लता देशमुख, मीनाक्षी बुद्रे, योगिता लड्डा, उषाताई केंद्रे, वंदना वाघमारे, हेमा सरकाळे, लक्ष्मी कंकाळ,या पालकांची प्रमुख उपस्थिती होती. 
     कार्यक्रमाची सुरुवात डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या वेळी प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांचे भाषणे झाली व आज जागतिक विकलांग दिनाचे औचित्य साधून आज शाळेतील विकलांग मुलांचा सत्कार करण्यात आला.
    आज संस्कार प्रा.शाळेने 'पालकांची शाळा' हा इयत्ता 5 विच्या परिसर अभ्यास या विषयातील एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आणि या उपक्रमाचा पालकांनी खूप आनंदाने आस्वाद घेतला आज पूर्ण दिवस शाळा चालवून त्यांनाही आपल्या रोजच्या पळापळीतून विध्यार्थ्यांना शिकवण्याचा आनंद मिळाला 
   या कार्यक्रमावेळी शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगताप सर तर आभार श्रीमती राऊळ मॅडम यांनी मांडले.

No comments:

Post a comment