तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 December 2019

गणेश प्राथमिक विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
शहरातील श्री गणेश प्राथमिक विद्यालयात  ६ डिंसेबर भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न महामानव प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. त्यांच्याच नेतृत्वात भारताच्या राज्यघटनेची निर्मिती झाली.  ६ डिसेंबर १९५६ साली या महामानवाने अखेरचा श्वास घेतला. त्यांना महापरिनिर्वाण दिनानिमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले. परम पूज्य ,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी  प्रमुख मार्गदर्शक हेमंत कदम, पोलिस निरीक्षक परळी वैजनाथ शहर,  संस्थेचे अध्यक्ष वैजनाथजी चाटे सर व जगताप सर सामाजीक कार्यकरते आणि मु अ  नागरगोजे मॅडम  सर्व शिक्षक मॅडम उपस्थीत होते. त्या वेळी संचलन मुंडे व्हि डि सर यांनी केले.

No comments:

Post a comment