तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 December 2019

खरोळा येथे ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे उद्घाटन संपन्नराजा प्रसेनजीत अल्पसंख्याक संस्थेचा पुढाकार

फुलचंद भगत
 वाशिम(प्रतिनिधी)दि.7 रोजी वाशिम येथून जवळच असलेल्या ग्राम खरोळा येथे युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय,भारत सरकार द्वारा नेहरू युवा केंद्र वाशिम,व राजा प्रसेनजीत अल्पसंख्याक शिक्षण संस्था व नेहरू युवा बहुऊद्देशीय मंडळ केकतउमरा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला, युवती यांना तीन महिन्याचा ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्धाटन नुकतेच जिल्हा युवा समनव्यक सम्यक मेश्राम यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गांवचे सरपंच दिपक खडसे होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संस्था अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी सांगितले की,महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे,व महिला, युवती यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून तीन महिन्यांचा ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी दिली. यावेळी उद्धाटनपर बोलतांना सम्यक मेश्राम म्हणाले की,महिलांनी,युवतींनी समोर येऊन आपला ठसा उमटवावा,पर्यायी एकत्र येऊन आपला छोटा,मोठा व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.हे सदर ब्युटी पार्लर  प्रशिक्षण सौ किरण संतोष सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला, युवती यांना शिकवल्या जाणार आहे.या कार्यक्रमाला उपसरपंच कैलास ठाकरे,मधुकर खडसे, महेश खडसे गजानन ठोबे,संतोष सोनुने उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a comment