तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 December 2019

नूतन विद्यालयात नौसेना दिन साजरासेलू / प्रतिनिधी : येथील नूतन विद्यालयात संरक्षणशास्त्र विभागच्यावतीने बुधवारी ( ४ डिसेंबर ) नौसेनादिन साजरा करण्यात आला. 
यावेळी 'एनडीए ' कॅडेट संगमेश कैलास मलवडे याचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी,उपमुख्यध्यापक मा.मा.सुर्वे, पर्यवेक्षक रामकिशन मखमले, रघुनाथ सोन्नेकर सोन्नेकर ,कैलास मलवडे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी कॅडेट संगमेश मलवडे याने , विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षा देऊन आपले करिअर घडवावे. शालेय जीवनातच विद्यार्थी घडतो. 'एनडीए' परीक्षेची तयारी कशी करावी या अनुषंगाने व सैन्यादलाविषयी माहिती दिली. 
सूत्रसंचालन गणेश माळवे, तर आभार प्रदर्शन देविदास सोन्नेकर, यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिश नावाडे, प्रशांत नाईक, संतोष पाटील, बाबासाहेब हेलसकर, उज्वला लड्डा, अनुजा सुभेदार, सौ.आष्टीकर, व्ही.एन. क्षीरसागर, शशिकांत पांडे, संतोष क्षीरसागर, के.के.देशपांडे आदींनी पुढाकार घेतला.

वार्तांकन: बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a comment