तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 8 December 2019

मराठी साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींनी पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवा-डॉ. एकनाथ मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- येथील ग्रामिण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. संमेलनात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या  व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार दिले जाणार आहेत. तरी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींनी पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवा असे आवाहन डॉ. एकनाथ मुंडे यांनी केले आहे. 

   परळी तालुक्यातील मौजे नाथ्रा येथे दि.17 ते 18 जानेवारी 2019 रोजी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अशा व्यकतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार असून 17 व 18 जानेवारी रोजी होणाऱ्या संमेलनात हे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. राजकीय, सामाजिक, समाजभुषण, कवी, लेखक, शिक्षण, आरोग्य, कृषी, आर्थिक, सांस्कृतीक, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य , कला, संस्कृती, वैज्ञानिक, धार्मिक, संशोधन व इतर क्षेत्रात विविध स्तरावर उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींची निवड करून श्रीनाथ मानव सेवा मंडळ तर्फे समाजभुषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तरी आपण केलेल्या कार्याचा पूर्ण तपशील व बायोडाटा तसेच स्वतःचे तीन फोटो सह 25 डिसेंबर पर्यंत  इच्छुकांनी पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव माहिती व फोटो सह पापनाथेश्वर माध्यमिक विघालय, नाथ्रा, ता.परळी वैजनाथ किंवा श्रीनाथ हाँस्पीटल, परळी वैजनाथ  मो.नं. 9850119393 या पत्यावर  पाठवावे असे आवाहन डॉ. एकनाथ मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment