तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 December 2019

दिव्यांगांना सायकलचे वाटप पवनराजे मित्र मंडळाचा उपक्रमसेलू / प्रतिनिधी : 
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सेलू शहरातील दिव्यांगाना
पवनराजे आडळकर मित्र मंडळातर्फे साईबाबा बँकेत तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले.
आत्माराम धोत्रे, बाबासाहेब मिंड, सुरेश लोखंडे अशी लाभार्थींची नावे आहेत. यावेळी साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर , माजी नगराध्यक्ष पवनराजे आडळकर , रतन दायमा, विनोद तरटे , नगरसेवक रहीमखाँ पठाण, श्रीनिवास मंत्री, रामराव लाडाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती

दिव्यांगानी हक्काप्रती जागरुक राहावे : उमाकांत पारधी

परभणी : दिव्यांगास मिळणाऱ्या योजना सवलती या उपकार नसून तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे दिव्यांगानी हक्काप्रती जागरुक राहावे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी सेलू ( जि.परभणी ) येथे केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सेलू येथे  आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. 
यावेळी जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे,, न्यायाधीश एस.एम. चव्हाण, घुमरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 
दिव्यांग आधार मंचच्या वतीने दिव्यांग महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा.राजाराम झोडगे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिव्यांग आधार मंचचे 
दीपक रामपूरकर,लक्षण धोतरे,, गुलाबराव खेडेकर, डिंगाबर घोळवे, लोखंडे, संदीप फुलारी, आदींनी पुढाकार घेतला.

वार्तांकन: बाबासाहेब हेलसकर


No comments:

Post a comment