तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

बायपास नसल्याने परळी शहरात अपघाताचे प्रमाण वाढलेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- गेल्या अनेक वर्षापासुन परळी शहरातुन बायपास करावा अशी मागणी होत आहे. परंतु याबाबत कोणतीही ठोक कारवाईही होऊन काम सुरु न झाल्याने शहरात अपघाताचे प्रमाण वाढले असुन अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागला. काल याचा परत एकदा याचा प्रत्यय्य आला. थर्मल रोड जवळील उड्डाणपुलावर राखेच्या वाहतुक करणार्‍या जड वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघ जण गंभीर जखमी आहेत.
बायपासचा प्रश्न लवकर मार्गी लागणार अशा प्रकारच्या अनेक घोषणा परळी करांनी ऐकल्या आहेत. परंतु अजुनही बायपास रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे. शासन स्तरावरुन याच्या काय हालचाली चालु आहेत. बांधकाम व रस्ते विभाग या बायपाससाठी किती मेहनत घेत आहेत. काम सुरु होण्यासाठी आणखी किती वर्ष परळीकरांना वाट बघावी लागणार.
परळी शहरातुन टँकर व हायवा या सारख्या जड वाहनांतुन क्षमते पेक्षा जास्त राख वाहुन नेली जाते. ऐवढेच नाही संपुर्ण शहरातुन व रस्त्यावर ही राख खाली पडत असल्याने प्रदुर्षणाचा प्रश्नही कायम निर्माण झाला आहे. याचा शहरातील व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. उघड्या वाहनातुन राख वाहतुक रोखावी यासाठी अनेक पक्ष व संघटनांनी पोलिस प्रशासनाला, परळी औष्णिक विज निमिर्ती केंद्राला मागणी केली आहे. परंतु यावरही शुन्य कारवाई दिसुन येते.
शहरात येणारे व जाणारे जड वाहने रोखायची असतील तर परळी शहराला दोन्ही बाजुंनी बायपास रस्त्याची नितांत गरज आवश्यकता आहे. आणखी किती निश्पाप लोकांचा बळी जाणार असा सवाल नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a comment