तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 December 2019

बीड जिल्हा कबड्डी संघात ओमप्रकाश काळे याची निवडपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
चिपळूण येथे दि.18 ते 22 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांसाठी बीड जिल्ह्याच्या संघाची शुक्रवार दि.13 रोजी घोषणा करण्यात आली. परळी तालुक्यातील पौळ पिंपरी येथील ओमप्रकाश काळे याची या संघात निवड करण्यात आली आहे.
जिल्हा कबड्डी असोसिएशनने शुक्रवारी कबड्डी संघाच्या निवडींची घोषणा केली. चिपळूणच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये हा संघ खेळणार आहे. जिल्हा कबड्डी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्याचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवड चाचणीची प्रक्रिया सुरू होती. या निवड प्रक्रियेत परळी तालुक्यातील पिंपरी गावचा ओमप्रकाश काळे याची निवड करण्यात आली आहे. तो आता चिपळूण येथील राज्यस्तरीय स्पर्धेत बीड जिल्हा कबड्डी संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन होत असून, सरस कामगिरीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

No comments:

Post a comment