तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 14 December 2019

जिंतूरचे शासकीय तंत्रनिकेतन बंद होण्या च्या मार्गावर संभाजी ब्रिगेड आक्रमक


जिंतूर
            जिंतूर तालुक्यातील एकमेव  अशा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये मोठ्याप्रमाणावर दुरूस्ती, बांधकाम,वीज जोडणी च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झालेला  भ्रष्टाचार तसेच राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी सोमवार 18 नोव्हेंबर रोजी या महाविद्यालयातील दोन शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने हा निर्णय तात्काळ रद्द करून या महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवार 13 डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
              तालुक्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कोणताही नफा तोटा विचारात न घेता फक्त जनतेच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आले होते राज्यपालांनी दिलेल्या निर्णयामुळे या महाविद्यालयातील शैक्षणिक सत्रातील दोन शाखा बंद करण्याच्या निर्णयामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने हा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तसेच या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर  पिळवणूक होत असून मोठी दुरवस्था झालेल्या वस्तीगुहा मध्ये मुलांना राहावे लागत आहे या वस्तीगृहाची अवस्था अत्यंत दयनीय असून या वस्तीगुहा मध्ये कुठल्याही प्रकारे पिण्याचे शुद्ध पाणी, विजेची व्यवस्था किंवा विद्यार्थीना राहण्यासाठी योग्य अशा प्रकारची कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. सदरील वसतिगृहाची इमारत ही विद्यार्थ्यांसाठी राहण्यास योग्य नसल्यास बाबतचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाविद्यालयास देण्यात आलेला आहे असे असताना विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असतानाही या विद्यार्थ्यांकडून या महाविद्यालय प्रशासनाने जीवितास धोका नसल्याबाबतचे हमीपत्र लिहून घेतले आहे तसेच या महाविद्यालयात वस्तीगुह दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर खोटे अहवाल तयार करून भ्रष्टाचार करण्यात आला आहे तसेच सध्या महाविद्यालयाच्या परिसरात मुलीं साठी नवीन वसतिगृह इमारतीचे काम मागील दोन वर्षापासून सुरु असून या कामावर मध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत आहे त्यामुळे या इमारत बांधकाम मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून सदरील बांधकामाची गुणवत्ता तपासणी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून करण्याची मागणी यावेळी सदरील निवेदनामध्ये करण्यात आली आहे निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश काजळे,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब काजळे व ज्ञानेश्वर रोकडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment