तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

ओमसाई पेट्रोल पंपावर डिझेलची चोरी


सिरसाळा  - तपोवन फाटा नजीक  रोडवरील प्रकार 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शेकडो लिटर डिझल चोरी झाल्यचा प्रकार सिरसाळा  - तपोवन फाटा रोड नजीक घडला आहे. मध्यरात्री साडेबारा ते तीन वाजताच्या दरम्यान प्रकार झाल्याचे समोर आले आहे. 
  याविषयी सविस्तर वृत्त असे कि,
  तपोवन फाटा येथे ओमसाई नावाचा पेट्रोल पंप आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२ : ३० ते ३  वाजताच्या दरम्यान दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी पेट्रोल पंपाची देखरेख करुन अंत्यतं चालाखीने डिझेल टॅकं चे लाॅक तोडून शंभर फुटाचा पाईप त्यात सोडून तो पाईप बाजूच्या शेतात नेला व त्या ठिकाणी कशाने तरी पेट्रोल ओसुन ३० ते चाळीस कॅडं भरले .यातील काही कॅडं संबधीत चोरटे घेऊन जाण्यास यशस्वी झाले परंतु दरम्यान नवीन पेट्रोल टॅकंर त्या ठिकाणी आले, पंपाचे कर्मचारी यांनी टॅकं चे लाॅक/ कुलुप पाहिले तर काही तरी गडबड असल्याचे समजले, कुलुप तुटल्याले होते. याच वेळी डिझेल चोरी गेले आहे हे समजले . पुर्ण प्रकार यावेळी ध्यनात आला. कॅडं भरुन रस्त्या काठी ठेवलेले ३० कॅडं मिळाले मात्र काही कॅडं घेऊन जाण्यात चोरटे यशस्वी झाले. पंपावरील नोदं नुसार समजले कि, १४०० लिटर डिझेल चोरी झाले होते. पैकी ९०० लिटर डिझेल मिळाले परंतु ५०० लिटर डिझेल घेऊन जाण्यास चोरटे यशस्वी झाले. याची किंमत ३७ हजार एवढी आहे.  हा प्रकार समजताच सिरसाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 
   पंपाचे व्यावस्थापक चंद्रकांत कराड यांच्या फिर्यादी वरुन सिरसाळा पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिरसाळा पोलिस प्रशासन करत आहेत.


दिड वर्षात दुसरा प्रकार 
    दीड वर्षा पूर्वी परळी रोडवरील समृद्ध पेट्रोल पंपावर चोरी झाली होती. त्यावेळी सुद्धा चोरट्यांनी अंत्यतं नाट्यमय रित्या चोरी केल्या चे समजते आहे.व आता ओमसाई पेट्रोल पंपावर चा हा प्रकार. यामुळे पेट्रोल पंप चालका मध्ये भितीचे वातावरण आहे.

No comments:

Post a comment