तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 December 2019

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन


विमुक्त-भटके केंद्रात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आरक्षण योजनेचा लाभ ओबीसी म्हणून घेतात तर राज्यात असैविंधानिक "विमुक्त-भटके"प्रवर्ग व्दारे विमुक्त १४जाती तर भटके २८ जमाती एकुण राज्यात ४२ जातींना ११टक्के आरक्षण मिळाले असून केंद्रात ३७४३जातीमध्ये १९ टक्क्यांची विभागणी द्वारे आरक्षणाचा लाभ मिळत असल्याने यातील विसंगती मुळे अनेकदा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी योग्य नियोजनानुसार या "विमुक्त-भटक्या" ओबीसींना संविधानातील घटनेनुसार त्यांचे सामाजिक न्याय व हक्कासाठी लढा चालुच ठेवून अखेर पर्यंत लढतच राहिले होते.

भारतातल्या वर्णव्यवस्थेतील शूद्र, अतिशुद्र जमातींना न्याय मिळवून देण्यासाठी या भारतात प्रथम छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांनी काम केले.भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या सारख्या वर्ण-वर्ग व्यवस्थेत समाजव्यवस्थेने नाकारलेल्या समुहांना "सामाजिक न्याय व हक्क" भारतीय राज्यघटनेव्दारे देऊन आमच्या सारख्या समूहांना खरा माणुस म्हणून जगण्याचा हक्क डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिला.
महाराष्ट्र राज्यात अनेक बहुजन-ओबीसी समुहासाठी नेतृत्व केले यामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, वसंतराव नाईक, छगनजी भुजबळ, एकनाथजी खडसे आदी नेत्यांनी काम केले पंरतु यात सर्वात प्रभावशाली या समुहाच्या समस्या सोडविण्यासाठी शीर्ष नेतृत्व म्हणजेच गोपीनाथरावजी मुंडेच.
भारताच्या संसदेसह महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा- विधानपरिषद मध्ये १९८० साला पासुन ओबीसी, विमुक्त-भटके,आदीवासीजातीजमातीसाठी सामाजिक, राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी गोपीनाथरावजी मुंडे साहेब अग्रेसर राहिलेले आहेत.
मुबंईच्या आझाद मैदानात स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव दीनी काढण्यात आलेला #"विमुक्त-भटक्यांचा"मेळावा आयोजित करण्यात आला होता."उचल्याकार"लक्ष्मण गायकवाड व माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली "बोंबाबोंब मोर्चा "काढण्यात आला होता.या मोर्चाला स्वतः तात्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब सामोरे आले होते.
मुंडे साहेबांनी "विमुक्त-भटक्या"कल्याणाच्या शासकीय काही घोषणा केल्या होत्या त्यात विमुक्त-भटक्यासांठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे ही मागणी मान्य करुन स्वातंत्रयांच्या नंतर प्रथमच या जातीजमातीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापन करण्याची घोषणा मुंडे साहेबांनी केली होती
गोवारी समाज हत्याकांड, आदिवासींचे कुपोषण यासाठी वस्ती, वाडे-पाडे, तांडे, पालापासुन ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेपर्यंत आवाज उठविला होता.साहेबांनी सरकारला नेहमीच कोंडीत पकडुन विधानभवन, संसदेत तर कधी रस्त्यावर उतरून कठोर संघर्ष केला आहे तर अनेकदा कारावासही भोगला आहे
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या अजेंड्यावर ओबीसी जातनिहाय जनगणना,ओबीसी समुहाच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी लोकशाही मार्गाने मोर्चे, आंदोलने,विधानसभेत-संसदेत प्रभावीपणे बाजु मांडून न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करत राहिले.मंडल आयोगाच्या पुर्ण शिफारशी स्विकाराव्यात व २७ टक्के आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात लागु करावे यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहिले. विमुक्त-भटके यांना केंद्रांत स्वतंत्र सुची अनुसूचित जमाती (ब) दर्जा देऊन त्यांना कायदेशीर सामाजिक न्याय व हक्कासाठी अथक प्रयत्न केले आहेत. गोवारी समाज हत्याकांड त्या समाजाच्या न्यायासाठी लढले शेवटी २०१८ साली नागपूर खंडपीठाने गोवारी समाजाला आदिवासी आरक्षण देण्याची मागणी मान्य केली यासाठी साहेबांनी खुप मोठा संघर्ष केला होता.ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे ही मागणी सतत करत राहिले ती मोदी सरकारने २०१९ साली मार्गी लावली आहे. नाँन-क्रिमीलेअर साठी सदैव पाठपुरावा, ओबीसी, विमुक्त-भटके यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक समस्येसाठी सदैव आयुष्यभर लढले.ओबीसी विद्यार्थ्यांना स्काँलरशिप, वस्तीगृह, परदेशी शैक्षणिक सवलती,विशेष सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला अश्या शेकडो समस्या सोडविणारा ओबीसींचा महाराष्ट्र राज्यातील राजा लोकनेता गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त "विमुक्त-भटक्या" जातीजमातीतील एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून साहेबांना नतमस्तक होऊन स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आली.

No comments:

Post a comment