तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 December 2019

डॉ.प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणी बुलडाणा जिल्हा एन.एस.यु.आय च्या वतीने निवेदन


बुलडाणा(प्रतीनिधी)  :- एका डॉक्टर तरुणीवर चार नराधमांनी सामुहिक अत्याचार करुन तीला जिवंत जाळल्याची संतापजनक घटना हैद्राबाद येथे घडल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. बुलडाणामध्ये विद्यार्थ्यांनी या घटनेचा विविध स्तरातुन निषेध व्यक्त केला. चारही नराधमांना तत्काळ फाशी द्यावी  या मागणीचे निवेदन बुलडाणा जिल्हा एन.एस.यु.आय.च्या वतीने देण्यात आले. या निवेदनात जिल्हा स्तरावर विशाखा समिती पुन्हा पुनगर्ठीत करून त्या कार्यान्वित कराव्यात, विशाखा कमिटीच्या बैठका नियमित घेऊन त्याचा अहवाल मागवावा, प्रत्येक विद्यालय आणि महाविद्यालयात विशाखा समिती स्थापन करावी, महिला-मुलींवरील अत्याचाराच्या केसेस जलदगतीत न्यायालयात चालवाव्यात, शहरातून आणि महामार्गावरील पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी, पीडित मुलगी, महिला यांना मानसिक धक्क्यातून सावरण्याकरिता मोफत आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था करावी. यादी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी एन.एस.यु.आयचे जिल्हाअध्यक्ष शैलेश खेडकर,उपाध्यक्ष मिलिंद मोरे,उपाध्यक्ष अक्षय वनारे,निलेश हरकल,सुशिलकुमार सोनेनु,शुभम पाटिल ,मयुर बोदडे,सचिन डोळे,राम पडित आदी एन.एस.यु.आय चे कार्यकर्ते, पदाधीकारी उपस्थीत होते.

No comments:

Post a comment