तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

पांचाळेश्वर येथे अंखड नामस्मरण सप्ताह व संगीत किर्तन महोत्सव
सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३ _"अवतार उदंड होती। सवेची मागुते विलया जाती। तैसे नव्हे श्रीदत्तमूर्ती। नाश कल्पांती नव्हेच।" महानुभव पंथाचे उपकाशी व श्री दत्तात्रेय प्रभुंचे नित्य भोजन स्थान असलेले श्री क्षेत्र पांचाळेश्वर ता.गेवराई येथे श्रीदत्त्तात्रेय प्रभू अवतार दिनानिमित्त अंखड नामस्मरण व संगीत किर्तन, सप्ताह चे मार्गशीर्ष शु.८ शके १९४१ दि.४ डिसेंबर बुधवार रोजीपासून आयोजन करण्यात आले आहे.
       कोल्हापुरला सकाळीची भिक्षा मध्यांहन भोजन श्री. क्षेत्र पांचाळेश्वर ला व निद्रा माहुरगडला असे दत्तात्रेय प्रभुंचे नित्य उपक्रम असुन श्रीक्षेत्रपांचाळेश्वर हे अन्यसाधरण महत्त्व असलेले स्थान आहे. आत्मतिर्थ सार्वजनिक धर्माचे तीर्थ.श्रीदत्तात्रेय प्रभू हे सार्वजनिक धर्माचे प्रर्वतक आहेत. सहस्रार्जुन व परशुराम ह्या परस्पर शत्रूंना ते वंदनीय आहेत. जगदगुरु शंकराचार्य यांना वरदान देणारे जगदगुरु श्री. दत्तात्रेय प्रभू चौवीस गुरुंचे विद्यार्थी आहेत. श्री. दत्तात्रेय प्रभू हे चतुर्युंगी अवतार आहेत, सृष्टीत येणाऱ्या जाणाऱ्या सजीवांप्रमाणे ईश्वरावतार हि येतात जातात पण श्रीदत्तात्रेय प्रभू हे चराचराचे साक्षीदार असुन दररोज परमेश्वराचा स्पर्श होणारे एकमेव श्री क्षेत्रपांचाळेश्वर तिर्थ स्थान असुन या तिर्थक्षेत्राचा महिमा अगाध आहे. म्हणून या महाक्षेत्राची सेवा, दर्शन, वंदन, स्तूती , स्तवन, पठण हे निश्चित हाडागदल्या पापाचं पुरश्चरण करणारं आहे. पांचाळेश्वर महास्थानाला पौराणिक संदर्भ पाहत असतांना आतऋषि व पांचाळराजांच्या घटनांचा परामर्श पाहतांना दंडकारण्याचा संबध येतो. पुराण काळातील सांस्कृतीक, आध्यात्मिक घटनांचे निरीक्षण करतांना असे लक्षात येते की, दंडकारण्य हे पुराणकाळातील घटनांचे - घडामोडीचे मुख्य केंद्रस्थान होते. मध्य भारतातील दंडकारण्य तापी आणि पयोष्णी नदी या नध्दांमधील प्रदेश व महाभारतातील काही भाग मिळुन होतो. रामायणामध्ये विंध्य पर्वत व शैल्य पर्वत यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशालाही दंडकारण्य असे म्हटलेले आहे. वायू पुराणात गोदावरी, कृष्ण नदी या दंडकारण्यातुन वाहतात. परिप्लस या पाश्चात्य विचारवंताच्या मतानुसार कल्याण, नगर, पैठण ही शहरे दंडकारण्यातच येतात. इक्ष्वाकु वंशातील दंडराजाच्या नावावरुन त्या भागाला दंडकारण्य असे म्हणतात .
       या अंखड नामस्मरण सप्ताह्यात महंत श्री. कु.श्वेता गुरु हालशीकर बाबा,परम पुज्य महंत श्री. आचलकर बाबा, भिष्मचार्य बाबा महानुभाव,  पुरम पुज्य महंत, कळमकरबाबा महानुभाव, कु. गिता शंकर आकाशकर, पुरम पुज्य महंत, खंदारकर बाबा महानुभाव, ह.भ.प. सोनाली दिदी करपे यांचे दि .४ ते ११ डिसेंबर दरम्यान किर्तने आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता श्रीदत्तात्रेय प्रभुंचा जन्मोत्सव साजरा होतो, या जन्मोत्सवासाठी देश विदेशातून बहुसंख्य भाविकांची उपास्थिती असते तसेच दुपारी श्री महाक्षेत्र श्री. दत्तात्रेय प्रभू भोजन स्थान ट्रस्टच्या वतीने पंचावत्तार उपहार महाप्रसादाने या जन्मोत्सवाच्या व नामस्मरण सप्ताहाची सांगता होणार आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment