तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 December 2019

ओम् श्री.काळूबा जय श्री.काळूबा नामाच्या जयघोषाणे मांडवा नगरी दूम दूमली ; हजारो भक्तांनी घेतले श्री.काळभैरवाचे दर्शनरती, महाप्रसाद व पालखी सोहळा मोठ्या थाटाने संपन्न

शालेय विद्यार्थींचे देखावे ठरले पालखीचे अकर्षण; नामवंत मल्लांनी कुस्ती खेळण्यासाठी लावली हजेरी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
तालुक्यातील मांडवा येथील ग्राम दैवत बोरणा नदिच्या काठावर वट वृक्षाच्या छायेत वसलेले निसर्गरम्यं देवस्थान हे मथुरा लभाण समाजाचे कुलदैवत माणल्याजाते.श्री.काळूबा महाराज यांची महापुजा, महाप्रसाद व पालखी सोहळा मोठ्या हर्षउल्हासाने संपन्न झाला.पालखी मिरवणूक दरम्यान ओम् श्री.काळूबा जय श्री.काळूबा महाराज यांच्या नाम जय घोषाणे मांडवा नगरी दूम दमून निघाली.मांडवा नगरी मध्ये चैतन्याचे वातावरण पसरले होते.पालखी समोर शालेय विद्यार्थी केले देखावे व कलशधारी मुलींनी सर्वांचे लक्ष वेधले होते. दिवस भर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पहाटे श्री.काळूबा महाराज यांची विधीवत महापूजा संपन्न झाल्या नंतर भजन करून गायन करण्यात आले.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पुर्व संधेला मथूरा लभाण समाजाच्या महिला व पुरूष यांनी त्यांचा पारंपारिक  पोशाख परिधान करून नगाडे वाजवत त्यांच्या भाषेत श्री.
काळूबा महाराज यांचे भक्ती गिताचे गायन व भजन केले.

श्री.काळूबा महाराज यांची मांडवा गावातून मोठ्या उत्साहाने पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली.पालखी समोर छोट्या छोट्या कलशधारी मुली पालखी सोहळ्याचे आकर्षण बनले .पालखी मिरवणूक दरम्यान सर्व भक्तांच्या मुखात ओम् श्री.काळूबा जय श्री.काळूबा नामाचा जय घोषण ऐकू येत होता.

पोलखी सोहळ्याची गावातून मिरवूण आल्यानंतर श्री.काळूबा महाराज मंदिरला पालखीच्या पाच प्रदक्षिणा घेण्यात आल्या व आरती करून पालखी ठेवण्यात  आली.नंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

याञोत्सवा दरम्यान प्रासाद,
नारळ,फुलं हार,खेळणी,रहाट पाळणे आदी दुकानांमुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता.

याञेत तेलंगणा,आंध्र प्रदेश आदी परराज्यातिल तसेच मराठवाड्यातून भाविकसह कुटूंब दोन दिवसीय मुक्कामी दाखल होतात.याञेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तसेच आरोग्य विभागाच्या वतिने प्रथमिक उपचार देण्यासाठी एक आरोग्य पथक दिवसभर ठाण मांडून होते.गावचे तलाठी सवईशाम व ग्रामसेवक बोंदलवार हे उपस्थित होते.

मांडवा ग्रामस्थांनी आपल्या गावात आलेल्या भक्तांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. आपल्या देवच्या दर्शनासाठी आले भक्त जणू आपल्या घरचे पाहूने आहेत आशा पध्दतीने भक्तांची काळजी घेतली.

जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबन भाऊ गित्ते, जि.प.सदस्य प्रा.मधुकर आघाव, शिवसेनेचे जेष्ठ नेते अभयकुमार ठक्कर,राष्ट्रवादी कँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डाँ.संतोष मुंडे,पांगरी उपसरपंच श्रीनिवास मुंडे, साप्ताहिक परळी समाचार अंकात श्री.कळभैरव देवस्थान याञेची कव्हर स्टोरी प्रकाशीत केलेले अंक वाटप करून संपादक आत्मलिंग शेटे याचा श्री.प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पञकार महादेव गित्ते तसेच अनेक प्रतिष्ठित व्यापारी, सरपंच,अधिकारी यांनी दर्शन घेतले.

जि.प.प्रा.शाळेच्या स्काऊट गाईच्या विद्यार्थींनी केली मदत

गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मंदिर मध्ये दर्शन रांगेत उभा राहून रांगेत दर्शन घेण्यासाठी सोय केली होती.रांगेत येऊनच दर्शन घेण्याची सवय स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी भक्तांना लावली. यामुळे दिवसभर भक्तांनी रांगेत येऊनच दर्शन घेतले.स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी वेळ देऊन सहकार्य केले.

कुस्त्या खेळण्यासाठी नामवंत पैलवांची हजेरी

श्री.काळूबा महाराज यांचा पालखी सोहळ संपन्न झाल्यानंतर मांडवा ग्रामस्थांच्या वतिने जिल्ह्यातील पैलवानांसाठी कुस्त्यांच्या दंगली भरवण्यात येतात. येथे कुस्त्या खेळण्यासाठी नामांकिंत पैलवान दाखल झाले होते. शेवटची मानाची कुस्ती विजेचा सन्मान करण्यात आला. पंच म्हणून गावातील नागरिकांनी काम पाहीले. 

शालेय विद्यार्थीच्या देखाव्यांनी वेधले लक्ष

आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थी घोड्यावर बसलेले श्री संत. भगवान बाबा, झांशीची राणी आसा देखावा तयार केले होते तर साडी परिधान करून कलश डोक्यावर घेतलेल्या मुली,भारत मातेचे देखावा तयार केला होता. जि.प.शाळेच्या विद्यार्थींनी प्रभू राम,सिता,लक्ष्मण,हनुमान यांचा हुबेहूब देखावा तयार करण्यात आला होता.यासाठी सर्व शिक्षक प्रचंड दिवसभर मेहनत घेतली.

No comments:

Post a comment