तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

मतदान कार्ड घरपोच देण्याची मागणीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
मतदान नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. परंतु मतदारांना मतदार कार्ड वेळेवर मिळत नाही. त्यामुळे तहसिल प्रशासनाने बी.एल.ओ. मार्फत किंवा पोस्टाद्वारे मतदारांना घरपोच मतदान कार्ड देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शेख अशफाक, शेख अतीक परळी विकास समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत परळी तहसिल कार्यालयात दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मतदार कार्ड मिळणे यासाठी आपण नियोजन करावे या करिता बी.एल.ओ.अथवा पोस्टाद्वारे घरपोच मतदाराला आणुन द्यावे अशी विनंती निवेदनाद्वारे परळी विकास समितीच्या वतीने शेख अशफाक यांनी केली आहे. निवेदनावर शोहेब खान, समिर पठाण, अझहर शेख, नविद सय्यद, अमिर पठाण, इम्रान पठाण, शेख बाबा, शेख अफसान, असेफ पठाण, शेख शरीफ आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment