तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 December 2019

नांदेड केंद्रातून जिंतूरच्या ‘वाडा’ नाटकास तृतीय पारितोषिक!जिंतूर (प्रतिनिधी):
           ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल मंगळवारी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने जाहीर करण्यात आला़ या स्पर्धेत नांदेडच्या ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळाने सादर केलेल्या ‘निळी टोपी’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावित बाजी मारली आहे़ द्वितीय पारितोषिक परभणी येथील मंडळाने सादर केलेल्या ‘सृजनमयसभा’ या नाटकाला जाहीर झाले असून, या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे़.

नांदेड येथील कुसूम सभागृहात १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ही प्राथमिक फेरी पार पडली या स्पर्धेत १५ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक कार्यसंचालक विभीषण चवरे यांनी जाहीर केला द्वितीय पारितोषिक बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणी या संस्थेच्या सृजनमयसभा  या नाटकासाठी  जाहीर करण्यात आल्याने ‘निळी टोपी’ व ‘सृजनमयसभा’ ही दोन्ही नाटके अंतिम फेरीत पोहोचली आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील नटराज कला विकास मंडळ या संस्थेच्या ‘वाडा’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

नाटकासाठी लेखक, दिग्दर्शक अतुल साळवे,नेपथ्य दत्ता चव्हाण, प्रकाश योजना बालाजी दामुके, संगीत दिनेश नरवाडे, सहभागी कलावंत सौ सुनंदा डिघोळकर, कांचन वसेकर,अतुल साळवे,कमलकिशोर जैस्वाल, योगेश गुंडाळे,सोहम खिल्लारे, हरिभाऊ कदम आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment