तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

श्री क्षेत्र आळंदी (दे.) भव्य श्री ज्ञानेश्वरी संगीत पारायण सप्ताहात नाव नोंदणी करावीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  ज्ञानेश्वरी संगीत पारायण सप्ताह श्री क्षेत्र आळंदी (दे.) येथे होणाऱ्या या संगीत पारायण सप्ताहात तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना नाव नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो. श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे श्री संत
ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी मंदीरात आपल्या सर्वांच्या भाग्याने महाराष्ट्रात पहिल्यांदाच श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे संगीत (स्वर-तालात) गायन करण्याची सेवासंधी लाभली आहे सप्ताह प्रारंभ दि. २७/१२/२०१९ सांगता ०३/०१/२०२० या काळात होणार आहे. यामध्ये  दैनंदिन कार्यक्रम सकाळी ६.३० - ७.०० विष्णूसहस्त्रनाम ७ ते ११ व दुपारी १ ते ४ ज्ञानेश्वरी संगीत पारायण तथा सांय ६ ते ८ या वेळेत हरिकिर्तन सेवा होईल. रहिवासाची भोजनाची व्यवस्था केली आहे. ज्या भाविक भक्त गायक, वादक, भजनी, श्रोते व सेवाधान्यांना पारायण
सोहळयात सहभागी व्हायचे आहे त्यांनी प्रत्यक्ष वा मोबाईलव्दारे आपली नोंदणी करण्यासाठी खालील १. श्री ह.भ.प.मनोहर महाराज मुंडे गुरुजी -९८८११०२३३३,  २. श्री ह.भ.प. बंडोपंत महाराज ढाकणे –९०११३०३२१२, ३. श्री रघुनाथराव मुंडे डाबर -९४२३७७८३९७, ४. श्री आत्माराम म मुंडे तळेगाव -७४९९५९८७८४, ५. श्री ह.भ.प.तुकाराम म गुटटे केदारेश्वर हॉटेल परळी वैजनाथ - ९९२१३७७७८२ यांच्याशी तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना संपर्क करावा अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

No comments:

Post a comment