तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

मोताळा प्रेस क्लब च्या वतीने जेष्ठ पत्रकार बांधवांचा सत्कार
औचित्य पत्रकार संरक्षण कायदा लागु झाल्याचे

मोताळा:- राज्यात पत्रकार सरंक्षण कायदा नुकताच लागू करण्यात आला,यामुळे सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकाराना या कायद्यामुळे संरक्षण मिळाले असून या कायद्यामुळे अधिक निर्भयपणे पत्रकारिता करता येणार आहे, या कायदा व्हावा यासाठी अनेक वर्षाची लढाई शासनासोबत सुरू होती ही लढाई सुरू केलेल्या तालुक्यातील जेष्ठ पत्रकारांचा सन्मान पंचायत समिती सभागृहात यावेळी करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील जेष्ठ पत्रकार,के जी शाह, अशोक घडेकर,मधुकर खर्चे,प्रकाश गणगे,वसंता जगताप,राजेश दोडे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
         कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले  या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गुड इव्हीनिंग सिटीचे प्रकाशक रणजितसिंग राजपूत उपस्थित होते सोबत विधी तज्ञ अँड मनिष शर्मा,पंचायत समिती सभापती उज्वलाताई अरविंद पाटील,उपसभापती राजेश्वरी कुवरसिंग परमार,माजी जि. प.अध्यक्ष पती चित्रांगन खंडारे,शरदचंद्र पाटील,प्रशांत वाघोदे,प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पाटील, मिलिंद जैस्वाल,राजेंद्र भामद्रे, विठ्ठल पाटील, तुळशीराम नाईक,सुरेश खर्चे,डॉ रविंद्र महाजन,गजानन मामलकर यांच्यासह जावेद खान,लुकमान शाह,निलेश बढे,रहीम शाह,हनिफ खान,प्रवीण पाटील,संजय भगत,राधेश्याम राठोड, सचिन शेळके, गोपाल काटे,शिवाजी मामनकर,पंकज थीगळे,संजय गरुडे,गणेश वाघ,लखन पाटील, शेख सादिक, ईसाक पटेल, विशाल तायडे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार,पोलीस पाटील,सरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                   यावेळी अध्यक्षीय भाषणांतून बोलताना रणजित राजपूत यांनी पत्रकारांवर होणारे हल्ले दुर्देवी आहेत,यासाठीच या कायद्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले,सोबतच प्रशासन,जनता,पोलीस याच्या योग्य समन्वयच सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी महत्वाचा असतो, पत्रकारांनी प्रशासन चुकेल तेथे वठणीवर आणण्याचे काम करत असताना चांगल्या कामही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आपल्या लेखणीतून केले पाहिजे अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली,विधी तज्ञ अँड मनिष शर्मा यांनी पत्रकार संरक्षण कायद्या संदर्भात उपस्थिताना सखोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन मिलिंद जैस्वाल यांनी तर आभार प्रदर्शन निलेश बढे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

No comments:

Post a comment