तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

डॉक्टर प्रियंका रेड्डी खून प्रकरणातील '' त्या '' नराधमांना जागीच फाशी द्या माजी नगरसेविका शोभना बद्दर
परळी वैजनाथ ( प्रतिनिधी ) :- तेलंगणा राज्यातील शमशाबाद याठिकाणी डॉक्टर प्रियांका रेडी यांच्यावर काही नराधमांनी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. ही बाब अत्यंत गंभीर असून देशात महिला असुरक्षित झाल्या आहेत. डॉक्टर प्रियांका रेड्डी यांना खर्‍या अर्थाने न्याय देण्यासाठी '' त्या '' नराधमांना जागीच फाशी द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ शोभना बद्दर यांनी केली आहे.
        तेलंगणा राज्यातील शमशाबाद या ठिकाणी ही अमानवीय घटना घडली असून डॉक्टर प्रियांका रेड्डी यांच्या सारख्या आता किती महिला बळी जाणार आहेत आणि कुंभकर्णी झोपेत असलेले केंद्रीय सरकार आणखी किती दिवस उघड्या डोळ्याने अशाप्रकारच्या घटना पाहणार आहेत असा सवाल करून सौ शोभना बद्दर म्हणाल्या की या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून डॉक्टर प्रियंका रेड्डी ची हत्या हत्या नसून ति मानवतेची हत्या झाली आहे. देशात आजतागायत महिलावर अत्याचार आणि अत्याचार करून तिचा खून अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत तरीदेखील गुन्हेगारावर कार्यवाही किंवा त्यांना कठोर शासनाच्या बाबतीत केंद्र सरकार गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि महिलांना चिंता करणारी आहे.
        केंद्र सरकार महिलांवरील अत्याचाराच्या घडणाऱ्या वेळोवळी घटना पाहता गंभीर नसल्याकारणाने दिवसेंदिवस महिलावर अत्याचार वाढतच आहेत. काही वर्षांपूर्वी दिल्लीत अशा प्रकारची घटना घडली होती. ती एकच घटना नसून अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत व घडत आहेत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या अशा घटना पाहता महिलांनी बाहेर फिरावे किंवा नाही असा चिंतेचा प्रश्न महिलां समोर उभा ठाकला आहे.
       देशामध्ये जर महिलांचे संरक्षण करणे होत नसतील तर केंद्रीय ग्रह मंत्र्यांनी तात्काळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि डॉक्टर‌ प्रियांका रेड्डी यांच्यावर अमानवी अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमांना तात्काळ जागीच फाशी  द्यावी जेणेकरून मयत डॉक्टर प्रियांका रेड्डी यांना  खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि अशा अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांची यापुढे महिलांकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही अशीही मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शोभना बद्दर यांनी केली आहे.

No comments:

Post a comment