तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

नेहरू युवा मंडळाच्या वतीने जागतिक एड्स दिवस साजरा
राजा प्रसेनजीत अल्पसंख्याक संस्थेचा पुढाकार

फुलचंद भगत
वाशीम(प्रतिनिधी)दि.2 येथून जवळच असलेल्या ग्राम केकतउमरा येथील सामाजिक, शासकीय, निमशासकीय कार्यात अग्रेसर असणारी राजा प्रसेनजीत अल्पसंख्याक,शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा मंडळ केकतउमराच्या वतीने वाशिम रेल्वे स्थानकांवर 1 डिसेंबर हा *जागतिक एड्स दिन* निमित्त जनजागृती करण्यात आली.व यावेळी नेहरू युवा केंद्र वाशिम तालुका समनव्यक प्रदीप पट्टेबहादूर यांनी उपस्थित लोकांना एड्रस बद्दल जागृत करून एक याबाबत कसलीही मनात शंका न ठेवता नजीकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन अगदी गुप्त वातावरणात आपली एच आय व्ही बाबत टेस्ट करू शकता. व एड्स पासून अलिप्त राहण्याची मुख्य जबाबदारी ती स्वतःचीच असल्याची भावना यावेळी प्रदीप पट्टेबहादूर यांनी व्यक्त केली.हा सदर एड्स निर्मूलन जनजागृती कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर,जिल्हा युवा समनव्यक सम्यक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.या एड्स निर्मूलन जनजागृती कार्यक्रमात प्रदिप पट्टेबहादूर,मंगेश पडघाण,हर्षद पट्टेबहादूर ,आकाश खडसे,अतिष तपासे,विजय कालापाड,राहुल इंगोले,सुजित पट्टेबहादूर,आकाश वाणी,अतिष टापरे यांच्यासह अनेक जण व रेल्वे प्रवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment