तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

अभिनव विद्यालयात भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक  तळ  परळी येथे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त व जागतिक अपंग दिनानिमित्त डॉक्टर हेलन केलर यांना संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ जब्दे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड तसेच प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक प्रताप मुंढे व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात डॉ . राजेंद्रप्रसाद व हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली या कार्यक्रमांमध्ये सहशिक्षक कृष्णा गवळी यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद व हेलन केलर यांच्याविषयी माहिती दिली
डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले. तसेच हेलन केलर हिचा जन्म २७ जून, इ.स. १८८० मध्ये टस्कंबिया, अलाबामा येथे झाला. तिच्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधलेल्या एव्ही ग्रीन या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. हेलनच्या आईचे नाव केट ॲडम्स होते. हेलनच्या वडिलांनी बरीच वर्षे 'टस्कंबिया नॉर्थ अलबमियन'चे संपादन केले व नंतर काही दिवस ते सांघिक राज्य सेनेचे कप्‍तान होते. हेलनची आजी ही रॉबर्ट ई ली यांची बहीण होती. हेलनची आई केट ही चार्लस ॲडम्स यांची मुलगी होती. हेलनच्या पूर्वजांपैकी एक जण हे झूरिचमध्ये मूक बधिरांसाठीचे पहिले पहिले शिक्षक होते नंतर हेलन केलर यांनी मूकबधिरांसाठी कार्य केले अशी माहिती कृष्णा गवळी यांनी दिली या कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a comment