तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

पालम ते लातूर रेल्वेचा मार्गे मंजूर करण्याची मागणी रेल्वे राज्यमंत्र्यानकडे केली आहे
अरुणा शर्मा


पालम :- पूर्णा ते लातूर या शहरांना जोडण्यासाठी पालममार्गे रेल्वे मार्ग मंजूर करावा, अशी मागणी लातूरचे खा.सुधाकर श्रूंगारे यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली आहे.
   रेल्वे मंत्रालयाने नांदेडहून लातूरमार्ग जोडण्याची अर्थसंकल्पात घोषणा केली होती. या मार्गाचे सर्व्हेक्षणही संबंधित यंत्रणेने पूर्ण केले होते; परंतु, या मार्गावर प्रवासी व इतर वाहतूक कमी प्रमाणात होईल. या कारणावरुन हा मार्ग निर्माण झालेला नाही. प्रस्तावित मार्ग हा पालम तालुक्यातून जाणार होता. परंतू तो अडगळीत पडला आहे. त्यामुळे नव्याने पूर्णा येथून पालम, अहमदपुर - लातूर रेल्वेमार्ग मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. 
  80 कि.मी.चे हे अंतर असून रेल्वेचे दोन विभाग या मार्गाने जोडले जाऊ शकतात. तसेच अकोलामार्गे खांडवा स्टेशन देखील या मार्गामुळे जोडले जाणार आहे. तेव्हा या मार्गाला मंजुरी द्यावी अशी मागणी खा. सुधाकर श्रूंगारे, बालाजी कुगणे, शामसुंदर मंदाना, मोतीलाल डोईजड यांनी राज्यमंत्री सुरेश अंगाडी यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment