तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

सेलूत जैन मंदिराचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा
सेलू (जि.परभणी ) :  येथील श्री नेमीनाथ दिंगबर जैन मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून शुक्रवारपासून ( २९ नोव्हेंबर ) रविवारपर्यंत ( १ डिसेंबर ) शताब्दी व वेदी प्रतिष्ठा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. 
शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता जैन मंदिरापासून महेशनगरपर्यंत श्री जिनेंद्र भगवान च्या प्रतिमेची रथातून मिरवणूक  काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांनी कलश घेऊन सहभाग नोंदविला, तर मुले-मुली उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मंगल कलशाची स्थापना निलेश व पियुष बिनायके यांच्या हस्ते झाली. प्रकाशचंद बिनायके यांनी ध्वजारोहण, तर मंडपाचे उद्घाटन बाबूराव कोकणे यांनी केले.
अष्ट प्रतिहार्य जिनवाणीची स्थापना पं.अभिनंदन शास्त्री, पं.विवेक जैन, पं.बिपीन, पं.सुनील शास्त्री, पं.प्रांजल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दुपारी चार वाजता 'श्रद्धा' या विषयावर बिपिन शास्त्री, तर 
' धर्मकक्ष ' व '  कुणीही कुणाचा कर्ता नाही ' या विषयावर पं.सुनील शास्त्री यांचे प्रवचन झाले. सायंकाळी इंद्र सभा झाली. या तीन दिवसीय महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. या महोत्सवात जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने नगरपालिकेच्या घडी टावरजवळील नव्याने बांधण्यात आलेल्या भगवान महावीर व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुख्याधिकारी देविदास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो : सेलू ( जि.परभणी ) येथील जैन मंदिराचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

वार्तांकन: बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a comment