तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 14 December 2019

डिसेंबर महिना आला, ऱ्हदय पिळवुन जाते, साहेबांच्या आठवणीने, नयनी आश्रु दाटुन येतेडिसेंबर महिना उजाडला की लाखो अनुयायांच्या डोळ्यासमोर गोपीनाथ मुंडे या नेतृत्वाचा चेहरा येतो. वर्षानुवर्षे त्यांच्या सान्निध्यात राहुन 12 डिसेंबर वाढदिवस साजरा करायचा.वेगवेगळे कार्यक्रम उपक्रमातुन घ्यायचे.कधी मुंबई तर कधी नागपुर.जिथे साहेब आहेत तिथे लोक जायचे. दुर्दैवाने साहेबांना जावुन पाच वर्षे होत आली.आजही ते गेलेत नव्हे नाहीत यावर विश्र्वास बसतच नाही. कारण प्रत्येकाच्या ऱ्हदयात हा नेता दडलेला आहे. पण ते नाहीत हे सत्य लपवता येत नाही. म्हणुन तर हा महिना उजाडला की ऱ्हदय पिळवुन जातं. त्यांच्या वेगवेगळ्या आठवणीने डोळ्यात आश्रु दाटुन येतात. केवळ बीड जिल्ह्यातील लाखो अनुयायांची अशी अवस्था नाही तर ज्यांचं कुणी वाली नाही अशा लोकांचं नेतृत्व या लाडक्या नेत्यांनी केलं त्या महाराष्ट्रातील  अठरापगड जातीधर्माच्या लोकांची अवस्था अशीच गळीतगात्र आहे आणि ज्ार केवळ नेता आणि कार्यकर्ता यांच्यातलं भावनिक नातं यावर जर अशा प्रकारे मानसिक त्रास होतो तर मग रक्ताचे नाते असलेल्या लेकींच्या ऱ्हदयातील दडलेल्या भावनांचं दु:ख याचं वर्णन शब्दांत करता येतच नाही. ऱ्हदयावर पाषाणासारखे दगडं ठेवुन पंकजाताई, प्रितमताई जेव्हा पावलं टाकतात अशा वेळी त्यांच्या भावना ओळखल्या तरी बस.
12 डिसेंबर गोपीनाथराव मुंडेंचा वाढदिवस. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महान नेता जो बीड जिल्ह्याचा सुपुत्र, ज्यांनी तब्बल 35 वर्षे जिल्ह्याचं नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पार्टी सर्वदुर घेवुन जाण्यासाठी आयुष्य वेचलं. मुंडे साहेबांच्या सहवासात एक नव्हे दोन नव्हे लाखाच्या संख्येपेक्षा कोटीच्या घरात जीवाभावाचे कार्यकर्ते सहवासात आले. हे असं एक व्यासपीठ होतं की ज्यांच्या सावलीला जावुनच सारे जण बसत होते. त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं बोलणं ऱ्हदयस्पर्शी आवाज, रूबाबदार चेहरा, केसावरचा कंगवा, चालणं या साऱ्या गोष्टी जीवाभावाच्या लोकांनी जवळुन पाहिलेल्या असतात. ग्रामीण मातीतलं आणि काळ्या आईच्या पोटातलं हे नेतृत्व असल्याने त्यांचा तो रांगडा स्वभाव.वर्तमानकाळानुरूप प्रत्येक हालचाली या नेत्याच्या बदलल्या. संघ व्यासपीठ असेल किंवा पक्षाचे व्यासपीठ असेल. एव्ाढेच नव्हे तर समाजबांधवाचा मेळावा असेल किंवा कार्यकर्त्यांची बैठक असेल. साऱ्या भुमिका वेगवेगळ्या.खरं तर आपण रंगभुमीवर वेगवेगळे नट होवुन गेल्याचे पाहतो. पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे नावाचे फार मोठे रंगकर्मी होवुन गेले असंही म्हणावे लागेल. कारण प्रत्येक ठिकाणी वेगळी भुमिका त्यांची असायची. शेतकरी, कष्टकरी यांच्यासमोर गेलं की चुलीवर भाजलेली भाकरी किंवा चिरगुटातली शिदोरी खायला ते मागे राहिले नाहीत. वस्ती, तांडे यावरही मुक्काम केले. जनावरांच्या छावण्यात, बाजावर केलेला मुक्काम एवढेच नव्हे तर एकेकाळी या नेत्याने पक्षाची पताका खांद्यावर घेवुन नदी, नाले,ओढे पार करत स्वत:ची कपडे पण ओढ्याला धुतलेली अनेकांनी पाहिले आणि मग तेव्हापासुनचा स्वभाव जवळुन पाहणारे जीवाभावाचे लोक आहेत. साहेबांचं कार्यकर्त्यांच्या घरी येणं प्रत्येक कुटुंबियांच्या सोबत संवाद साधणं आणि शब्दाची फेक करत थट्टामस्करी करणं हे अनेकांना मन आकर्षित करणारं होतं. त्यांच्या आठवणी प्रत्येका जवळ एवढ्या आहेत की गोपीनाथ मुंडे हे फक्त मलाच मानतात अशा प्रकारचा भाव अनेकांच्या मनात असतो. त्यांचा हात खांद्यावर पडला की आपला उद्धार झाला अशी भावना रूढ होती आणि राजकारणात ते सिद्धही झालं आहे. त्यांच्या जवळ गेलं की जीर्णोद्धार उदा.बीड जिल्ह्याच्या राजकारणात मातब्बर पुढाऱ्याचे राजकिय दुकान बंद झाली. तेव्हा त्या दुकानाच्या कड्या उघडण्याचं काम या नेत्याने केलेलं आहे. अंबाजोगाईचं शिक्षण, विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, विरोधी पक्ष नेता, पक्षाचं प्रदेश अध्यक्ष, भाजयुमोचं प्रदेश अध्यक्ष, राज्याचा उपमुख्यमंत्री नंतर बीडचे दोन वेळा खासदार आणि ग्रामविकास मंत्री हा त्यांच्या राजकारणाचा इतिहास तत्कालीन काळात इथपासुन पाहणारे त्यांचे सहकारी आजही केवळ बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. खरं तर मुंडे साहेब ही शक्ती लोहचुंबकीय होती. एकदा त्यांच्याजवळ किंवा त्यांच्या सावलीला माणुस आला की त्यांना चिटकुन रहायचा.तदनंतर अनेकांनी धोके दिले. तरी पण पुन्हा गेलेला परत चिटकला ही त्यांच्याजवळ माया होती.अर्थात राजकिय अस्पृश्यता कधीच त्यांनी ठेवली नाही. म्हणुनच लोक आणि कार्यकर्ते अगदी जीवापाड त्यांच्यावर प्रेम करायचे. कधी कधी डिसेंबर महिना हा कुठल्याच कॅलेंडरवर किंवा पंचांगात नसायलाच पाहिजे असंही अनेकांना वाटतं. कारण जन्मदात्यांच्या दु:खाचा कदाचित प्रसंगान्वये विसर पडतो.मात्

No comments:

Post a Comment