तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 8 December 2019

हैद्राबाद बलात्कार पीडीताच्या आरोपीचे एन्काऊंटर शहरातील डॉक्टरांकडून पोलिसांचे अभिनंदनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
हैद्राबाद येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिचा खुन करणार्‍या नराधम चार आरोपींचे हैद्राबाद पोलिसांनी एन्काऊंटर करुन त्यांना ठार केल्यानंतर शहरातील महिला डॉक्टरांनी शहर पोलिस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांचे अभिनंदन केले.
संपूर्ण भारताला हादरुन सोडणार्‍या हैद्राबाद येथील या घटनेतील चार आरोपींना पोलिस घटनास्थळी तपासाला घेऊन गेले होते. यावेळी पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना हैद्राबाद पोलिसांनी चारही आरोपींना गोळ्या घालून ठार केले.
परळी शहरातील महिला डॉक्टरांनी पोलिस निरीक्षक हेमंत कदम, पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलिस सहाय्यक निरीक्षक आरती जाधव, डी.बी.पथकाचे रमेश सिरसाट, दत्त गित्ते व पोलिस कर्मचार्‍यांचा डॉ.शालिनीताई कराड, डॉ.बालासाहेब कराड, डॉ.एल.डी.लोहिया, डॉ.अजित केंद्रे, डॉ.काबरा, डॉ.रंजना घुगे, डॉ.अनुराधा काळे, डॉ.दैवशाला घुगे, डॉ. रुक्मिणी मुंडे, डॉ.नेहा शेख, डॉ.अर्चना मिसाळ, डॉ.सुनिता झंवर आदी यावेळी उपस्थित होते.

गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातुन सुटु शकतो. त्यामुळे हैद्राबाद पोलिसांनी या आरोपींचे एन्काऊंटर केल्याने गुन्हेगारीला आळा बसु शकतो. त्यामुळे तेलंगना पोलिसांचे खुप खुप अभिनंदन.
डॉ.शालिनीताई कराड

No comments:

Post a Comment