तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 14 December 2019

इंग्रजी भाषा संवाद कौशल्य आत्मसात करा : बी.पी.पृथ्वीराज

परभणी जिल्ह्यातील पहिली इंग्रजी भाषा प्रयोगशाळा

सेलू , दि.१४ ( प्रतिनिधी ) : महाविद्यालयीन जीवनात इंग्रजीत आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी शालेय जीवनापासूनच इंग्रजी बोलण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी केले.
सेलू ( जि.परभणी ) येथील नूतन महाविद्यालयात परभणी जिल्ह्यातील पहिल्या अत्याधुनिक इंग्रजी भाषा कौशल्य प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. यावेळी ओ.श्रीनिवास, संस्थेचे सचिव डी.के.देशपांडे, सहसचिव डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, श्री व सौ. गोविंदराव लटपटे, हेमंतराव आडळकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी ससाणे, गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराज म्हणाले, " मातृभाषेतून आपल्या भावना, मत व्यक्त करणे प्रत्येकाला सहज जमते. परंतु माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात व्यक्त होण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. त्यासाठी ही प्रयोगशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. परभणी जिल्ह्यातील या पहिल्या अत्याधुनिक इंग्रजी भाषिक प्रयोगशाळेचा जिल्ह्यातील विविध संस्था, विद्यार्थी निश्र्चितच लाभ घेतील."
या भाषा प्रयोगशाळेच्या माध्यमातून भविष्यातील योजनेव्दारे ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रभावीपणे प्रशिक्षण  दिले जाईल, अशा भावना गोपीनाथ लटपटे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
प्रास्ताविक डॉ.एम.एस.शिंदे यांनी केले. प्रयोगशाळेची माहिती डॉ.निर्मला पद्मावत यांनी दिली. सूत्रसंचालन प्रा.सुषमा सोमाणी, तर प्रा.नागेश कान्हेकर यांनी आभार मानले.

माजी विद्यार्थी लटपटेंचे योगदान

नूतन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गोपीनाथ लटपटे यांच्या आर्थिक योगदानातून 'गोविंदराव लटपटे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स ॲन्ड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लॅब' उभारण्यात आली आहे हे विशेष. ही इंग्रजी भाषा प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

फोटो :  सेलू ( जि.परभणी )  येथील नूतन महाविद्यालयतील 
इंग्रजी भाषा संवाद कौशल्य प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना बी.पी.पृथ्वीराज. यावेळी डॉ.एस.एम.लोया, ओ.श्रीनिवास, डी.के.देशपांडे, डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, डॉ.शरद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पूर्ण...

No comments:

Post a comment