तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

सूतगिरणीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणीचे निवेदन वैजनाथ हत्तिअंबिरे यांनी वस्त्रोद्योग आयुक्त नागपुर यांना दिले

अरुणा शर्मापालम :- तालुक्यातील पेठशिवणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी सूतगिरणीचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकीय संचालक मंडळाची नेमणूक करुन चौकशी करावी, अशी मागणी वैजनाथ हत्तीअंबिरे यांनी वस्त्रोद्योग आयुक्त नागपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
    पेठशिवणी येथील सूतगिरणीचे तत्कालिन चेअरमन आणि व्हॉईस चेअरमन यांनी सूतगिरणीचे बॉईलॉजमध्ये कलम (1) (8) (5) मध्ये हस्तलिखितात बदल करुन अणि शेअर्स कमी असल्याचे कारण पुढे करुन या संस्थेच्या निवडणुकीत सहभागी होऊ इच्छित असलेल्या संस्थापक सदस्यांना व सभासदांना व निवडणूक लढवू इच्छित असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढविण्या पासून वंचित ठेवले. आणि स्वत: बिनविरोध निवडून आलेलो आहोत असे दाखवले. हा सर्व प्रकार सूतगिरणीच्या मालमत्तेवर डोळा ठेवून घडविण्यात आलेला आहे. कोणत्याही सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. तसेच सदरील सूतगिरणीचे सन 2017 पासून आजपर्यंत अद्यापही लेखापरीक्षण करण्यात आलेले नाही.
   आजपर्यंत या सूतगिरणीची एकही वार्षिक व सर्वसाधारण सभा बोलावण्यात आलेली नाही. त्यामुळे या सूतगिरणीला चेअरमन, व्हॉईस चेअरमन व एमडी या सारखे जबाबदार पदे भरलेली आहेत किंवा नाही हे सर्वसामान्य नागरिकांना कळण्यास मार्ग नाही. त्यामुळे सूतगिरणीचे विद्यमाने संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करुन प्रशासक नेमावे व संस्थेच्या सभासदांना बॉयलॉज मधील (1) (8) (5) मधील शेअर्सची रक्कम पूर्वीसारखीच करुन निवडणूक लढविण्याचा मार्गे मोकळा करावा आदी विविध मागण्यांचे निवेदन वैजनाथ हत्तिअंबिरे यांनी वस्त्रोद्योग आयुक्त नागपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a comment