तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 December 2019

शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार पैसे बुलडाणा :--
टीम महाराष्ट्र देशा : परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता शासनाने वितरित केला. मराठवाड्यासाठी 3,200 कोटींपैकी 819 कोटी 63 लाख रुपये देण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयाने हे वाटप सुरू केले असून, अवघ्या 11 दिवसांत यातील 817 कोटी 89 लाख 27 हजार रुपये म्हणजे 99.79 टक्के मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. उर्वरित येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नुकसान झालेल्यापैकी आतापर्यंत 10 लाख 74 हजार 915 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे.एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या निकषानुसार 13 नोव्हेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकसानीची संपूर्ण माहिती राज्य शासनाकडे पाठवलेली आहे. परतीच्या पावसादरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यांतील 325 तालुक्यांमधील पिकांचे नुकसान झाले होते. राज्यात सर्वांत जास्त नुकसान हे मराठवाड्यात झाले. विभागातील तब्बल 41 लाख 49 हजार 175 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दिवाळीनंतर याचे तातडीने पंचनामे करण्यात आले.
राज्यपालांनी घेतलेल्या बैठकीनंतर 18 नोव्हेंबरच्या शासन आदेशानुसार राज्यातील 34 जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यासाठी दोन हजार 59 कोटी 36 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार मराठवाड्याला 819 कोटी रुपये प्राप्त झाले. त्यानुसार विभागीय प्रशासनाकडून त्या-त्या जिल्हा प्रशासनाला सदर निधीचे वाटप करण्यात आले होते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे.मराठवाड्यात एकूण शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यानंतर विभागातील 44 लाख 33 हजार बाधित शेतकऱ्यांसाठी तीन हजार 237 कोटी 76 लाख 84 हजार 960 रुपयांची आवश्यकता आहे. पहिला टप्पा आता पूर्णत्वाकडे असून, यानंतर दुसरा नि तिसऱ्या टप्प्याचे पैसेही लवकरच मिळतील, अशी आशा आहे.
—----____________----_--

जिल्हानिहाय शेतकऱ्यांना
 अनुदान वाटप

जिल्हा— शेतकरी संख्या– वाटप अनुदान– टक्केवारी
औरंगाबाद– 1 लाख 50 हजार 23– 121 कोटी 81 लाख– 100
जालना– 1 लाख 50 हजार 714– 110 कोटी 18 लाख– 99. 97
बीड– 2 लाख 23 हजार 904– 143 कोटी 96 लाख– 99.85
लातूर– 1 लाख 14 हजार 343– 99 कोटी 60 लाख– 98.93
उस्मानाबाद– 97 हजार 613– 78 कोटी 19 लाख– 100
नांदेड– 1 लाख 70 हजार 659– 123 कोटी 14 लाख– 100
परभणी– 99 हजार 007– 87 कोटी 49 लाख– 99.85
हिंगोली– 68 हजार 652– 53 कोटी 48 लाख– 99.48
एकूण– 10 लाख 74 हजार 915– 817 कोटी 89 लाख– 99.79

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment