तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 December 2019

परळी पंचायत समिती समोर विविध मागन्यासंदर्भात ग्रामस्थांचे उपोषण तिसर्या दिवशीही सुरुचपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  ग्रामसभा न घेणे, अयोगध्यानगर, वसंतनगर भागातील रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे कामे, शौच्छालयाची चौकशी होवून ही कारवाई न झाल्याच्या बाबत जिरेवाडी ग्रामस्थ दि.२ डिसेंबर पासून परळी पंचायत समितीपुढे अमरण उपोषणास बसले असुन आज दि.4 डिसेंबर रोजी तिसर्या दिवशीही उपोषण सुरुच आहे.
    जिरेवाडी येथील ग्रामसभेबाबत वारंवार कळवूनही ग्रामसभा घेतलेली नाही., अयोध्यानगर व समता नगर मध्ये सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे, शौच्छालयाची चौकशी करुनही कुठलीच कारवाई अद्याप पर्यंत गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी केलेली नाही. चौकशी मध्ये बोगस कामे दिसून आले. परंतु यावर अद्याप काहीच केले नाही, ग्रामपंचायत अंतर्गत अमृत शौच्छ खड्डे समता नगर व बँक कॉलनी भागात केलेली असून हे सर्व खड्डे बोगस आहेत. याची चौकशी करावी, रमाई घरकुल अंतर्गत जागा उपलब्ध नसतांनाही त्याची पुर्णपणे चौकशीकरुन कारवाई करावी आदी मागण्यासाठी उपसरपंच शिवाजी महादेव मुंडे, ग्रा.पं. सदस्य नरेश उत्तम मुंडे, बालाजी मुरलीधर मुंडे, निवृत्ती अंकुश मुंडे, सौ.सारीका रामधन कांदे, विद्यासागर पिराजी गायकवाड, उषाबाई अण्णा गायकवाड, झीगराबाई भानुदास पारधे, कुसाबाई नामदेव सातपुते आदींनी निवेदन दिले असून दि.2 डिसेंबर पासुन उपसरपंच शिवाजी महादेव मुंडे, विष्णू भगवान मुंडे, सहदेव वसंत कांदे, विठ्ठल मुंजाजी रोडे, ज्ञानोबा लहुदास मुंडे, बालाजी मुरलीधर मुंडे हे अमरण उपोषणास बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी उपोषणार्थींची तब्येत खालवली आहे. रुग्णवाहिका 108 चे वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल चाटे यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्ते यांची तपासणी करून त्यातील महादेव मुंडे यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण व रक्तदाब कमी झाल्यामुळे पुढील उपचाराकरिता उपजिल्हारूग्णालय परळी येथे दाखल केले.  पंचायत समिती प्रशासनाकडुन अद्याप ठोस आश्वासन दिले नसल्याने हे उपोषण तिसर्या दिवशीही सुरुच आहे.

No comments:

Post a comment